डोंबिवली- येथील फडके रस्त्यावरील माॅडर्न कॅफे हॉटेलचे संस्थापक किट्टा उर्फ अण्णा रामा शेट्टी यांचे सोमवारी सकाळी कर्नाटक मधील मंगलोर जवळील शिबरुर गुथ्थू गावी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, अजित, शैलेश ही मुले, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.गाव स्वरुपात असताना किट्टा शेट्टी यांनी ५५ वर्षापूर्वी डोंबिवलीत फडके रस्त्यावर कौलारु घरात सहा बाकडे, मंचकांचा आधार घेऊन माॅडर्न कॅफे हाॅटेल सुरू केले. दाक्षिणात्य पध्दतीचे चवीदार डोसा, इडली वडा, उतप्पा खाद्य पदार्थ ग्राहकांना मिळाले पाहिजेत यासाठी त्यांनी पहिले प्रयत्न केले. तीच चव ५५ वर्षानंतर किट्टा शेठ यांच्या माॅर्डन कॅफे आणि संलग्न साखळीतील हाॅटेलमध्ये ग्राहकांना चाखायला मिळते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा