कल्याण: नोकरीवर जाण्यास मनाई करून ऐकत नसल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने पत्नीवर चाकू हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला. शहाड परिसरातील रस्त्यावर शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. तीन महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. रंजीता शेट्टी असे गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे. तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या तक्रारीवरुन महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पती शशिकांत शेट्टी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हल्ला केल्यानंतर शशिकांत फरार झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी सांगितले, कल्याण जवळील शहाड भागात शशिकांत शेट्टी हे पत्नी रंजिता हिच्यासोबत राहतात. तीन महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला आहे. शेट्टी कुटुंब सुस्थितीत आहे. लग्नाच्या आधीपासून रंजीता ही मुंबईतील विद्याविहार येथील एका खासगी कंपनीत नोकरी करते. विवाहानंतर शशिकांत तिला नोकरी करू नकोस असे वारंवार सांगत होता. पण रंजिता नोकरी करण्यावर ठाम होती. यावरुन त्यांच्यात भांडणे होत होती.

हेही वाचा >>> कल्याण – डोंबिवलीत बेकायदा बांधकामे तोडण्याची जोरदार मोहीम

नेहमीप्रमाणे शुक्रवारी रंजिता कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडली. त्यावेळी घरात काही बोलता येत नसल्याने शशिकांतने तिला शहाड परिसरातील रस्त्यात गाठले. तिला कामावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ती कामावर जाण्यासाठी ठाम होती. रस्त्यात दोघांमध्ये वाद झाला. यावेळी संतापलेल्या शशिकांतने तिच्यावर धारदार चाकुने हल्ला करुन तिला जखमी केले. तिला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर आहे. फरार आरोपी शशिकांतचा पोलीस शोध घेत आहेत.