ठाणे : कोकण इतिहास परिषदेच्या १४ वे राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक, पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. अरविंद जामखेडकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या अधिवेशनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ इतिहासकार, शास्त्रज्ञ, संशोधक डॉ. करुष दलाल हे भूषविणार आहेत. या परिषदेत कोकणातील आदिम ते आधुनिक नागर संस्कृतीचा इतिहास या विषयावर अनेक मान्यवर आपापले शोध निबंध सादर करणार आहेत. या अधिवेशनात १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या कोकणावरील संशोधन ग्रंथास रोख पुरस्कार आणि मानपत्र दिले जाणार आहे. या परिषदेत ४० शोध निबंध अपेक्षित असल्याची माहिती सचिव डॉ. विद्या प्रभू यांनी दिली. शोध निबंध ग्रंथाचे प्रकाशन यावेळी करण्यात येईल. तसेच, गतवर्षी १३ व्या कोकण इतिहास परिषदेच्या राष्ट्रीय अधिवेशनात सादर झालेल्या दोन उत्कृष्ट शोध निबंधास बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. हे अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते सायं. ५.३० पर्यंत डी.जी रुपारेल कॉलेज, माटुंगा (प.), मुंबई येथे संपन्न होणार आहे.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
pushpa 2 director wants to quit industry
Video : चेंगराचेंगरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे मोठे विधान, व्हिडीओ झाला व्हायरल
tejashri pradhan shares post about her hashtag tadev lagnam marathi movie not enough screens
सिनेमा हाऊसफुल, तरीही थिएटर नाहीत…; तेजश्री प्रधानची खंत! ‘हॅशटॅग तदेव लग्नम्’ चित्रपटासाठी पोस्ट करत म्हणाली…
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”

हे ही वाचा… Video : काटई कर्जत राज्यमार्गावर मोठी वाहतूक कोंडी; नोकरदार, दूर पल्ल्याचे प्रवासी अडकले

हे ही वाचा… एका नागरिकाची नजर पडली अन् मांज्यात अडकले कबुतराचे वाचले प्राण

सार्वजनिक ऐतिहासिक संग्रहालय उभारण्याची मागणी

ठाणे जिल्ह्यात अनेक प्राचीन शिल्प सापडले आहेत. परंतू, हे शिल्प ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे हे शिल्प मुंबईत पाठवावे लागतात. ठाणे जिल्ह्याला इतक्या वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे या जिल्ह्यात एक ऐतिहासिक संग्रहालय उभारले पाहिजे अशी मागणी कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून गेले अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. परंतू, शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची खंत कोकण इतिहास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव टेटविलकर यांनी व्यक्त केली. सतिश प्रधान यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या नावाने एक वास्तू शहरात उभारावी असे आश्वासन दिले आहे. तर, ती वास्तू ऐतिहासिक संग्रहालय असावे अशी आमची मागणी असल्याचे कोकण इतिहास परिषदेच्या सदस्यांनी सांगितले.

Story img Loader