पूर्व द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कोपरी रेल्वे पूलावर तुळई जोडण्याचे काम केले जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यंत दररोज मध्यरात्री कोपरी पूलावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहतूक शाखेने घेतला आहे. बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा पूल बंद असणार आहे. तर गुरुवारी रात्री ११ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारा पूल बंद असणार आहे. त्यामुळे मध्यरात्री पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा >>> कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत रस्ते कोंडीमुक्त; रस्त्यांवरील भंगार वाहनांची आधारवाडी कचराभूमीवर रवानगी

पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पूलाच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. यातील पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून मुख्य पूलाच्या म्हणजेच दुसऱ्या टप्प्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. या कामाचा एक भाग म्हणून या मार्गावर बसविलेल्या तुळई जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे बुधवार ते शुक्रवारपर्यंत दररोज मध्यरात्री आणि पहाटेच्या वेळेत वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> बांधकाम परवानगीचे विकासकांचे १ कोटी ९१ लाखांचे धनादेश निधी अभावी परत; कल्याण-डोंबिवली पालिका नगररचना विभागातील प्रकार

बुधवारी रात्री ११ ते गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणारा पूल बंद असणार आहे. तर गुरुवारी रात्री ११ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणारा पूल बंद असणार आहे.

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना ऐरोली किंवा मुलुंड मार्गे पर्याय उपलब्ध आहेत. तर, ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक बदल पुढील प्रमाणे असतील.

असे आहेत वाहतूक बदल

जड-अवजड वाहनांकरीता

१) नाशिक मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबई पूर्व द्रुतगतीमार्गाने मुंबईच्या दिशेने वाहतूक कणाऱ्या जड अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे. ही वाहने खारेगांव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा मार्गे महापे मार्गे रबाळे ऐरोली पूल येथून इच्छित स्थळी जातील.

२) घोडबंदर मार्गाने मुंबई जाणारी वाहने माजीवडा पूलाखाली वेश बंद असेल. येथील वाहने तत्त्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाडा पूलावरुन खारेगाव टोलनाका येथून गॅमन चौक, पारसिक रेती बंदर, मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा, महापे मार्गे जातील.

हलक्या वाहनांकरीता

१) नाशिक, घोडबंदर मार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना तीन हात नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने साकेत, कळवा मार्गे ऐरोली पूल येथून मुंबईच्या दिशेने वाहतूक करतील. किंवा मध्यवर्ती कारागृह येथून कळवा, एरोली पूल मार्गे मुंबईच्या दिशेने वाहतूक करतील. तसेच तीन हात नाका येथून एलबीएस रोड मार्गे किंवा तीन हात नाका येथून सेवा रस्ता, बाराबंगला, आनंदनगर मार्गे वाहतूक करतील.

Story img Loader