ठाणे – विधानसभा निवडणुकीत कोपरी -पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार केदार दिघे यांना पराभवाचा सामना करावा लागला. हे अपयश पाचवून दिघे आता, या मतदारसंघात पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. नुकतीच त्यांनी सावरकर नगर भागातील शिवसेना (ठाकरे गट) शाखेत पदाधिकाऱ्यांची बैठक घेत संघटनात्मक बांधणीबाबत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
विधानसभा निवडणुकीत कोपरी – पाचपाखडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध उबाठा गटाचे केदार दिघे अशी लढत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिवंगत धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य तर, केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे ही लढत सर्वात महत्वाची मानली जात होती. प्रचारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारसदार, लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना, महिला सशक्तीकरण, युवांसाठी योजना, वीज सवलत असे मुद्दे मांडले होते. तर, केदार दिघे यांनी गद्दार विरुद्ध निष्ठावंत, रक्ताचे आणि खरे वारसदार, वाढलेली महागाई, गॅस सिलेंडरच्या दरात झालेली वाढ, रोजगार, गुजरातला गेलेले प्रकल्प, वाहतूक कोंडी, पाणी टंचाईची समस्या, जाती-धर्माचे राजकारण, असे मुद्दे मांडले होते. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ लाख २० हजार ७१७ मतांची आघाडी घेत केदार दिघे यांचा पराभव केला.
मुख्यमंत्री शिंदे यांना या निवडणुकीत १ लाख ५९ हजार ६० इतकी मते मिळाली तर, केदार दिघे यांना ३८,३४३ इतकी मत मिळाली. या पराभवानंतर केदार दिघे या मतदारसंघात अधिक सक्रिय झाले असून त्यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. सावरकर नगर भागातील शिवसेना (उबाठा ) शाखेत नुकतीच त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेत, संघटनात्मक चर्चा आणि इतर बाबींवर लक्ष केंद्रीत केले. तसेच महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पुढील संघटना बांधणी बाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.
हेही वाचा – कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात शुक्रवारी पाणी नाही
विधानसभा निवडणूक आढावा त्यासह येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संघटना बांधणी गरजेचे आहे. त्यासाठी जे काम करावं लागत, त्या पद्धतीचे नियोजन या बैठकांमार्फत चालू आहे. येत्या काही दिवसात ठाणे, ओवळा – माजिवडा आणि कोपरी पाचपाखाडी या मतदारसंघाची संयुक्त बैठक देखील आयोजित केली जाणार आहे. – केदार दिघे, ठाणे जिल्हा प्रमुख, शिवसेना (उबाठा )