ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहिनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट भागाला २० दशलक्षलीटर इतका वाढीव पाणी पुरवठा सुरु करण्यात आला असून त्यापाठोपाठ आता गेल्या काही वर्षांपासून पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या दिवेकरांना साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी देण्यात आले आहे. यामुळे दिव्यातील पाणी टंचाईची समस्या सुटेल, असा दावा पालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले असून शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या पुढे गेली आहे. संपुर्ण शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ४८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. लोकसंख्येच्या मानाने तो अपुरा पडू लागला आहे. ठाणे शहर, कोपरी, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत आहे. पाणी टंचाईच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असतानाच, मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेऊन भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्षलीटर तसेच मुंबई महापालिकेच्या कोट्यातील २० दशलक्षलीटर पाणी देण्याचे आदेश दिले. यामुळे ठाणे शहराला एकूण १२० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी मिळणार आहे.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
navi mumbai cyber crime
यंदा नवी मुंबईत १ अब्ज ३७ कोटींहून अधिक रुपयांची सायबर लूट
BMC chief inspects development works in Borivali
विकासकामांच्या गुणवत्तेवर अधिक भर द्यावा; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे अधिकाऱ्यांना आदेश
indonesia tsunami 2004 (1)
दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेणाऱ्या ‘त्या’ विध्वंसाने त्सुनामीचा पूर्वइशारा देणारी प्रणाली कशी बदलली?
20 years after Indian Ocean tsunami
Indian Ocean Tsunami: २००४ च्या त्सुनामीची भीषणता २० वर्षांनी काय शिकवून गेली?
Adani group, dharavi, Adani group dharavi banner,
नवे सरकार सत्तेवर येताच अदानी समुहाकडून धारावीत जोरदार फलकबाजी, बहुभाषिक धारावीत गुजराती फलकांचाही समावेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या जलवाहीनीवरून नवीन जोडणी घेत कोपरी, किसननगर आणि वागळे इस्टेट या भागांना वाढीव २० दशलक्षलीटर पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यात किसननगर, भटवाडी भागाला ४ दशलक्षलीटर, वागळे इस्टेट येथीस इंदिरानगर संप हाऊसवरून पाणी पुरवठा होणाऱ्या भागांना १० दशलक्षलीटर आणि कोपरी, आनंदनगर भागाला ६ दशलक्षलीटर असे वाढीव पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ एमआयडीसीने दिवा भागात साडे सहा दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी उपलब्ध करून दिले असून त्याचा शुभारंभ मंगळवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी महापौर नरेश म्हस्के आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. दिवा भागातील नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त होते. ही समस्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपुर्ण शहराला १२० दशलक्षलीटर इतके वाढीव पाणी दिले असून त्यातील साडे सहा दशलक्षलीटर इतके पाणी दिव्याला उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे येथील पाणी टंचाईची समस्या आता सुटेल, अशी प्रतिक्रीया खासदार शिंदे यांनी दिली.

Story img Loader