डोंबिवली – पुण्यात कोयता टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस यंत्रणा सरसावली असतानाच, आता डोंबिवलीत कोयता टोळीने धुडगूस घालण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी रात्री कोयता हातात घेऊन पाचजणांनी डोंबिवली पूर्वेतील एक ज्येष्ठ महिला आणि तिचा आजारी पती यांच्या घरात घुसून धुडगूस घातला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार केली तर पुन्हा मारण्याची धमकी दिली. या कोयता टोळीमुळे डोंबिवलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जितू निशाद (४०) हा कोयता टोळीचा प्रमुख असून त्याच्या सोबतीला पाच गुंड आहेत. जितू हा कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. या कोयता टोळीविरुद्ध बेबी मधुकर देसले (५२, रा. देसलेपाडा) यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले, शनिवारी रात्री १० वाजता तक्रारदार महिला बेबी आणि तिचा आजारी पती घरात एकटे होते. त्यांच्या दारावर अज्ञात पाच व्यक्ती हातात कोयते घेऊन बेबी यांचा मुलगा मन्या तू घराबाहेर ये, तुला ठार मारतो, असे बोलत दरवाजावर लाथाबुक्का आणि ओरडा करत होते. या पाच जणांमध्ये जितू निशाद हा गुंड आणि त्याचा साथीदार हातात कोयते घेऊन आले होते. मुलगा घरात नाही, असे बेबी पाचजणांना खिडकीतून सांगत होत्या. तो घरातच आहे, असे बोलत जितूने महिलेला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. दरवाजा उघडला नसता तर आपण दरवाजा तोडून घरात घुसू अशी धमकी त्याने दिली होती.

हेही वाचा – सौर उर्जा वापरात कल्याण-डोंबिवली पालिका देशात अव्वल, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांची माहिती

बेबी यांनी दरवाजा उघडताच हातात कोयते नाचवत जितूने बेबी यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्यावर कोयता उगारण्यात आला. आता आपल्याला ठार मारले जाईल या भीतीने बेबीने बचावासाठी ओरडा केला. तेव्हा शेजारी, पादचारी बेबी यांच्या घरात बचावासाठी शिरले. त्यावेळी जितू आणि त्याच्या साथीदारांनी बचावासाठी आलेल्या नागरिकांना तुम्ही मध्ये पडलात तर तुम्हाला कोयत्याने मारू, अशी धमकी दिली. आणि टोळी हातात कोयते घेऊन रस्त्यावर नाचू लागली. बेभान झालेली टोळी घरात घुसेल या भीतीने परिसरातील रहिवाशांनी घराचे दरवाजे बंद केले. बेबीच्या बचावासाठी कोणीही पुढे गेला नाही.

हेही वाचा – जमिनीचे वाद टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ‘सलोखा योजना’

बेबी घरात एकट्या असताना जितू टोळी पुन्हा बेबी यांच्या घरात घुसली. त्यांनी बेबी यांना शिवीगाळ मारहाण करत मन्या कुठे आहे ते सांग, असे बोलत घरात शोध घेतला. तो आढळून आला नाही. ही गोष्ट पोलीस ठाण्यात सांगितली तर तुम्हाला मारून टाकू, अशी धमकी देत बेबी यांच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने वार करत टोळी तेथून पसार झाली. बेबीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी.बी. बाकले तपास करत आहेत.