कल्याण – कल्याण पश्चिमेत एका इमारतीच्या गच्चीवर असलेल्या धुळीने भरलेल्या सौरपट्या साफ करण्याचे काम सोमवारी एक मजूर करत होता. ही साफसफाई करत असताना सौरपट्ट्यांच्या बाजुला उभा असलेला मजूर तोल जाऊन अचानक जमिनीवर कोसळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. हा मजूर शहापूर तालुक्यातील खर्डी जवळील उंबरमाळी गावचा रहिवासी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यशवंत तुळशीराम गवारी (४०) असे मरण पावलेल्या मजूर कामगाराचे नाव आहे. या मजुराची पत्नी सुरेखा गवारी यांच्या तक्रारीवरून खडकपाडा पलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. गवारी कुटुंब हे मुळचे पुणे जिल्ह्यातील हडपसर तालुक्यातील कोटमवाडी गावचे आहे. मोलमजुरीसाठी ते उंबरमाळी येथे राहत होते. ते कसारा लोकलने दररोज मोलमजुरीसाठी कल्याण येथे येत होते.

हेही वाचा >>>‘मेट्रो ४’च्या खर्चात तब्बल १२७४.८० कोटी रुपयांनी वाढ

मयत यशवंत यांची पत्नी सुरेखा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीत म्हटले आहे, की आपले पती यशवंत गवारे हे सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान कल्याण पश्चिमेतील वायलेनगर भागातील आरती नगरीतील वृंदावन पाम सोसायटीच्या ए विंगमधील गच्चीवर जाऊन सौलर पट्टया साफ करून धुण्याचे काम करत होते. हे काम करत असताना ते पट्ट्यांच्या कठड्याला उभे राहत होते. हे काम करत असताना अचानक यशवंत गवारे यांचा तोल गेला. ते इमारतीवरून जमिनीवर पडले. वेगाने जमिनीवर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना तातडीने सोसायटीतील रहिवाशांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात आणले. तेथे दाखल करण्यापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

ही माहिती मिळताच खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक एस. एस. शिवले, साहाय्यक पोलीस निरीक्षक अंबिका घस्ते घटनास्थळी दाखल झाले. या पाहणीनंतर मयताच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Laborer dies after falling while cleaning solar panels on building in kalyan news amy