ठाणे – मुंबई-नाशिक मार्गावर रस्त्याचे काम करणारा एक मजुर रस्त्यावर उभ्या असलेल्या रोलरजवळ वामकुक्षी घेत होता. त्यावेळी रोलर चालकाने कोणतीही शहानिशा न करता रोलर सुरू केला. तो रोलर त्या मजुराच्या अंगावरुन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्या रोलर चालका विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा >>> घोडबंदर मार्गावर मेट्रोच्या कामासाठी अवजड वाहतूकीला बंदी; ठाणे वाहतूक पोलिसांनी काढली अधिसुचना
पोलिसांनी तक्रारीच्या आधारे रोलर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाशकुमार लड्डू महंतो (२५) असे मृत मजुराचे नाव आहे. मुंबई – नाशिक मार्गावरील बाबोसा कंपाऊंडजवळ सुरु असलेल्या रस्त्याच्या कामात तो मजुरीचे काम करत होता. दुपारी जेवणानंतर प्रकाशकुमार रस्त्यावर उभ्या असलेल्या रोलरजवळ वामकुक्षी घेत असताना, त्यावेळी, रोलर चालकाने कोणतीही शहानिशा न करता निष्काळजीपणे रोलर सुरू केला. रोलर प्रकाशकुमारच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रकाशच्या भावाने रोलर चालका विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.