पालघर जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाडा तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शनिवारी वाडा येथे घेतलेल्या बैठकीत तालुक्याच्या विकासाबाबत विविध सूचना केल्या. नुसत्या मागण्या करू नका, कामांचा पाठपुरावा करीत राहा, असे अधिकाऱ्यांना सांगून जे अधिकारी विकासकामांत निष्काळजी करतील त्यांची दखल घेतली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी या वेळी दिला.

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी वाडा तालुक्याच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित केली होती. या बैठकीला तालुक्यातील शिक्षणाधिकारी, पाटबंधारे, जलसंपदा, लघुपाटबंधारे आदी विविध विभागांचे अधिकारी गैरहजर राहिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या आढावा बैठकीत ‘वाडा कोलम’ या तांदळाला भौगोलिक (जी.आय) मानांकन मिळण्यासाठी येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आजवर विशेष प्रयत्न न केल्याने त्यांना चांगलेच जिल्हाधिकारी यांनी धारेवर धरले. येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा ही २० वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत विचारणा केली असता पत्रव्यवहार सुरू असल्याचे वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी सांगितले, मात्र नुसता पत्रव्यवहार करून थांबू नका पाठपुरावा करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शिंदे यांनी या वेळी दिला. शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी येथील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपंचायतीने संयुक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी या वेळी दिले. वाडय़ातील कचराभूमीचा प्रश्न सोडविण्यासाठी या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्याचे सांगून प्लास्टिकचा वापर बंद करण्याचे आदेश दिले.  या आढावा बैठकीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार शांताराम मोरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नीलेश गंधे, प्रांतअधिकारी अर्चना कदम, तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.