नीरज राऊत

शेती, मासेमारीला फटका; माहीम ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
50 to 60 school students hospitalised after lpg gas leak at jsw company in jaigad
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये एलपीजी वायू गळती; नांदिवडे माध्यमिक विद्यालयाच्या ५० ते ६० विद्यार्थ्यांना त्रास
parks in navi mumbai city in worse condition
उद्याने बकाल; सुरक्षा धोक्यात; महानगरपालिकेच्या अनास्थेमुळे नवी मुंबई शहरातील उद्यानांची दुरवस्था
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
Lakshmi Road will be closed again within three months after Ganeshotsav
गणेशोत्सवानंतर तीन महिन्यातच ‘लक्ष्मी रस्ता’ पुन्हा राहणार बंद, काय आहे कारण?
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

पालघर तालुक्यातील पाणेरी ओहोळ सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाला आहे. या ओहोळातील पाण्याचा फायदा परिसरातील शेतीला होतो. मात्र प्रदूषित पाण्यामुळे पिकांवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय ओहोळातील प्रदूषित पाण्यामुळे मासे आणि पक्षी मृत होत असल्याचेही दिसून आले आहे. या ओहोळावर अवलंबून असलेल्या माहीम ग्रामस्थांनी या प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

केळवे रोड परिसरातून पानेरी ओहोळाचा उगम होतो. परिसरातील पावसाचे पाणी या ओहोळातून वाहते. सूर्याच्या पाटबंधारे प्रकल्पाच्या पाटाला पाणी सोडल्यानंतर कमारे परिसरातील पाणी या ओहोळात मिसळते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना फायदा होतो आणि एप्रिल-मे महिन्यांपर्यंत त्यांना पाणी सिंचनासाठी वापरता येते. अगदी उन्हाळय़ातही ओहोळाला पाणी असल्याने परिसरातील बागायती शेती मोठय़ा प्रमाणावर होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून पालघर नगर परिषदेकडून सांडपाणी या ओहोळात सोडले जाते. त्याचप्रमाणे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधील रासायनिक सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता ओहोळात सोडले जाते.

हा ओहोळ प्रदूषित झाल्यानंतर २८ माशांच्या आणि १९ पक्ष्यांच्या प्रजातींवर परिणाम झाला आहे. ओहोळातील मासे मोठय़ा प्रमाणावर मृत झाल्याचे माहीम ग्रामस्थांनी सांगितले. ओहोळातील पाण्याला दरुगधी येत असून या पाण्याचा वापर शेतीसाठी करता येत नसल्याचे परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले. ओहोळातील पाणी कधी तांबूस तर कधी जांभळय़ा रंगाचे असते. ओहोळाच्या बाजूने एखादी व्यक्ती गेल्यास दरुगधीमुळे अस्वस्थ वाटायला लागते, असे माहीम ग्रामस्थांनी सांगितले. माहीममधील ग्रामस्थांनी अनेकदा पाणेरी ओहोळाच्या प्रदूषणाचा मुद्दा शासकीय पातळीवर मांडला. मात्र अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्य शासकीय विभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

या माशांवर परिणाम

निवटी, मोडी-खरबी, बोय, पातळ्या, काळी कोलंबी, कोलबंट, लाल कोलबंट, सफेद कोलबंट, पट्टेदार कोलंबी, चिंबोरी, शिंगाळी, शिवणी, खाजरी, अडाविल, सरबट, टोणी, धामण्या, लहान वाव, हिसल, किली, माकूल, पिसका, तांबसूल, तांब, जिपटी, तारली, वेखूळ, जवळा, कोळिम, पाकट.

पाणेरी ओहोळातील प्रदूषणाबाबत माहीम ग्रामस्थांकडून निवेदन प्राप्त झाले आहे. पाणेरीमधील प्रदूषणाला जबाबदार सर्व घटकांना एकत्रितपणे घेऊन बैठकीचे आयोजन या आठवडय़ात करण्यात येणार आहे.

– महेश सागर, तहसीलदार, पालघर

माहीममधील ग्रामस्थ आणि पाणेरी पाणी बचाव संघर्ष समिती प्रदूषणाच्या बाबत लढा देत आहे. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच शासकीय पातळीवर त्याची दखल घेतली जात नाही

– विकास मोरे, माजी सरपंच, माहीम

Story img Loader