ठाणे : मुंब्रा बाह्यवळण मार्गावर खडी मशीन रोड परिसरात दरड कोसळल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेत जीवतहानी टळली असून घटनेमुळे परिसरातील वाहतूक काहीकाळ मंदावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंब्रा बाह्यवळण मार्गावरून जड-अवजड वाहनांची वाहतूक मोठ्याप्रमाणात होते. या मार्गालगत पारसिक डोंगर आहे. बुधवारी दुपारी मुंब्रा बाह्यवळण मार्गावरील खडी मशीन परिसरात शिळफाटा येथून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवर दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ मंदावली होती.

हेही वाचा – वैज्ञानिक प्रगतीत बुद्धिमत्ता हेच सामर्थ्य, महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे अध्यक्ष डॉ. विवेक सावंत यांचे प्रतिपादन

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापालिका आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी रात्रीदेखील दरड कोसळल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुन्हा दरड कोसळल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Landslide on the mumbra bypass ssb