ऐरोलीच्या मनोहर जोशी यांना कार; डोंबिवलीच्या ज्योती जोशी यांना लडाख भ्रमंतीची संधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’च्या सहाव्या पर्वाचा अंतिम बक्षीस समारंभ शनिवारी ठाण्यातील घोडबंदर येथील आयलिफ रीट्झ बँक्वेट येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. २५ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या या महोत्सवाला ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. महोत्सवात ऐरोलीच्या मनोहर जोशी यांना कार मिळाली. तर डोंबिवलीच्या ज्योती जोशी यांना इशा टुर्सतर्फे लडाख येथे जाण्याची संधी मिळाली.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली परिसरातील दुकानांमध्ये खरेदीवर आकर्षक बक्षिसे जिंकण्याचा आनंद लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने ग्राहकांनी घेतला. महिनाभर सुरू असलेल्या या महोत्सवाला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शॉपिंग फेस्टिव्हलच्या अंतिम पारितोषिक वितरण समारंभात मनोहर जोशी यांना ‘लोकसत्ता’चे तरुणकुमार तिवाडी आणि सुब्रतो घोष यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच ज्योती जोशी यांना ‘लोकसत्ता’चे सचिन शेनॉय, सायरस रिपोर्टर, मॅड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे जतिन कोटक आणि ईशा टुर्सचे सुरज गुरव यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. कुणाल रेगे यांनी उत्स्फूर्त सूत्रसंचालनाने खरेदी महोत्सवाच्या अंतिम बक्षीस समारंभाची रंगत वाढवली.

प्रयोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ पितांबरी आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने पार पडला. ईशा टुर्स हे या शॉपिंग फेस्टिव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर होते. टीजेएसबी हे बँकिंग पार्टनर होते. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट, रेमन्ड तलावपाळी आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर होते. डिजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजीटल पार्टनर होते. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, कृष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक होते. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटीनम पार्टनर होते. तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर होते. लँन्डमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर तर प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर आणि ब्रम्हविद्या हे हिलिंग पार्टनर होते.

विजेत्यांच्या प्रतिक्रिया

कार बक्षीस मिळाल्याने खूप आनंद होत आहे. ‘लोकसत्ता’चा शॉपिंग फेस्टिव्हल असाच सुरू राहावा. पुढच्या वर्षी मी पुन्हा शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहे.

– मनोहर जोशी, ऐरोली, कार विजेते

दोन ते तीन वर्षांपासून लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये भाग घेत आहे. यंदा बक्षीस मिळाल्याने घरातील सर्वजण चकित झाले. लडाखला फिरायला जाण्याची खूप इच्छा होती. या बक्षिसामुळे ती पूर्ण झाली.

– ज्योती जोशी, डोंबिवली, लडाख सफर विजेत्या

विजेत्यांची नावे

’ पूनम कुलकर्णी (कुर्ला) – मायक्रोवेव्ह

’ दिनेश विचारे (ठाणे) – मायक्रोवेव्ह

’ शांताराम कोले (घणसोली) – वॉशिंग मशीन

’ मिना अलवाणी (कल्याण) – वॉशिंग मशीन

’ सुजाता नाडगौडा (कल्याण) – रेफ्रिजरेटर

’ विना धामने (नेरुळ) – रेफ्रिजरेटर

’ सतेंद्र पाल (ठाणे) – एलईडी टीव्ही

’ मेधा शाह (ठाणे) – एलईडी टीव्ही

’ सुलोचना घुले (कल्याण) – एलईडी टीव्ही