शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचा सारथी तुषार राजे (४८) यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. तुषार राजे अनेक वर्ष आनंद दिघे यांचे अर्माडा हे वाहन चालवीत होते. अपघात झाला त्यावेळीही राजे त्यांच्या सोबत होते. ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याकडे एम एच ०५ जी २०१३ क्रमांकाचे अर्मार्डा वाहन होते. राजे हे अनेक वर्ष दिघे यांच्यासोबत दौऱ्यावर किंवा गणेशोत्सव काळात ठाणे, पालघर येथे जाताना त्यांचे वाहन चालवीत असे. दिघे यांचा ठाण्यात अपघात झाला त्यावेळीही राजे हे वाहन चालवीत होते. ते २४ ऑगस्ट या दिवशी दिघे यांच्याकडे वाहनचालक म्हणून रुजू झाले होते. म्हणून दिघे त्यांना प्रेमाने २४ ऑगस्ट म्हणत असत. ते टेंभी नाका येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी राजे यांना न्युमोनिया झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा