ठाणे : विधी (लॅा) अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परिक्षेच्या (सीईटी) कासारवडवली केंद्रावरील सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना परिक्षेसंदर्भात कोणतीही ठोस माहिती दिली गेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि त्यांचे पालक धास्तावले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घोडबंदर कासारवडवली येथील साईनाथ नगर परिसरात विधी अभ्यासक्रमाच्या सामाईक प्रवेश परिक्षेचे केंद्र होते. मंगळवारी सकाळी ९ वाजता येथील केंद्रावर परिक्षा होणार होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यासह विविध भागातून सकाळी ७ वाजेपासूनच सुमारे ७०० विद्यार्थी आणि त्यांचे पालक परिक्षा केंद्रावर येण्यास सुरूवात झाली होती. विद्यार्थ्यांना सकाळी ७:३० वाजेनंतर परिक्षा केंद्राच्या आत सोडण्यात आले.  तेथील कर्मचाऱ्यांकडून परिक्षेची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परिक्षा सुरू होण्यापूर्वीच काही संगणकांच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. दुपारी १२ वाजेनंतरही हा बिघाड प्रशासनाला दुरूस्त करता आला नाही. तांत्रिक बिघाड असल्याने अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देता आली नाही. विद्यार्थ्यांची पुन्हा परिक्षा केव्हा होईल याबाबतची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थी तणावात असल्याचे एका पालकाने सांगितले. या गोंधळा दरम्यान जाब विचारण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना काही पोलिसांनी प्रवेशद्वारावरून हकलवून दिल्याचा आरोप काही पालकांनी केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Law course entrance test server down students missed exam technical glitch ysh