लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा वसाहती मधील व्हीएनतो इमारतीमध्ये रविवारी वाहन उभे करण्यावरून वकील आणि त्याच्या आईला तीन जणांनी बेदम मारहाण केली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

शरद मनारी असे मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे. सागर पाटील, अरविंद पाटील आणि अन्य एक अनोळखी इसम अशी आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी सांगितले, वकील शरद मनारी राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्याला त्यांनी आपले वाहन उभे केले होते. त्या वाहनाच्या पाठीमागे आरोपी सागर पाटील यांनी वाहन उभे केले होते. त्यामुळे शरद यांना वाहन बाहेर काढताना अडचण निर्माण झाली होती.

हेही वाचा… डोंबिवलीमध्ये दहाजणांची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

वकील शरद यांनी आरोपी सागर यांना वाहन असे उभे का केले आहे अशी विचारणा केली. त्याचा राग सागर यांना आला. त्यांनी शरद यांना ठशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच सागर यांचा भाऊ अरविंद, आणि अन्य एका इसमाने शरद यांना मारहाण केली. आम्ही गाववाले आहोत. आम्ही तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी दिली. हा वाद सुरू असताना शरद यांची आई मध्यस्थी करण्यासाठी आली. त्यावेळी आरोपींनी त्यांना जमिनीवर पाडून त्यांनाही मारहाण केली. आईला मारहाण होत असताना शरद पुढे धावले त्यावेळी त्यांना अडवून आरोपींनी पुन्हा मारहाण केली. शरद यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सागर आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyer and his mother brutally beaten up for parking in palava dombivali dvr
Show comments