लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : येथील आधारवाडी भागात राहत असलेल्या एका वकील महिलेच्या अल्पवयीन शाळकरी मुलाचे बुधवारी सकाळी अज्ञात इसमांनी अपहरण केले. कल्याण परिसरात शोध घेऊनही मुलाचा शोध न लागल्याने त्याच्या कुटुंबीयांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात या अपहरण प्रकरणी तक्रार केली आहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court on maternity leave
दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
Koyta-carrying gangster arrested, gangster Tadipar,
पुणे : कोयता बाळगणाऱ्या तडीपार गुंडाला पकडले
Four people from Dombivli arrested, Kalyan girl selling,
कल्याणमध्ये दीड महिन्याच्या बालिकेची विक्री करणाऱ्या डोंबिवलीतील चार जणांना अटक
19 absconded from Chitalsar police custody arrested from Lucknow in up
पोलीस कोठडीतून फरार झालेला उत्तर प्रदेशातून अटकेत
Hardeep Singh Nijjar aide Arsh Dala Arrested
भारतातील मोस्ट वाँटेड दहशतवाद्याला कॅनडात अटक; खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरचा निकटवर्तीय अर्श डल्ला कोण आहे?

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी भागातील चाणाक्य नगर भागात ॲडव्होकेट हिमनील महेश पवार राहतात. त्यांचा १५ वर्षाचा मुलगा कल्याण मधील एका शाळेत शिक्षणासाठी सायकलवरून जातो. बुधवारी सकाळी साडे नऊ वाजता नेहमीप्रमाणे मुलाने आपल्या आईला मी शाळेत जात आहे, असे सांगून तो एकटाच सायकलवरून शाळेत जाण्यास निघाला.

आणखी वाचा-ठाणे : घोडबंदर मार्ग लवकरच अधिक रुंद

मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत गेला असेल म्हणून पालक निश्चिंत होते. शाळा सुटल्यावर संध्याकाळी मुलगा घरी आला नाही म्हणून पालकांनी त्याचे मित्र, शाळेत चौकशी केली तेव्हा तो शाळेत नसल्याचे अपहृत मुलाच्या पालकांना समजल्यावर ते घाबरले. त्यांनी तात्काळ शाळा, कल्याण परिसरात मुलाचा शोध घेतला. तो आढळून आला नाही. मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करून मुलाची आई ॲडव्होकेट हिमनील पवार यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ए. एस. पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी विशेष तपास पथके तयार करून या प्रकरणाचा शोध सुरू केला आहे.