लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: ठाणे महापालिकेच्या वतीने विचारमंथन व्याख्यानमाले अंतर्गत लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी, ०१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता, काशिनाथ घाणेकर लघू प्रेक्षागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे हे ‘स्वातंत्र्य संग्रामातील लोकमान्य टिळक यांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. ‘लोकमान्य ते महात्मा’ हा द्विखंडात्मक ग्रंथ, ‘तुकाराम दर्शन’ हे सांस्कृतिक इतिहास लेखन, ‘कर्मयोगी लोकमान्य’ हे लोकमान्य टिळक यांचे चरित्र या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले आहे. घुमान येथे भरवण्यात आलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
आणखी वाचा-ठाणे : टीएमटीच्या बसगाडीला आग; सुमारे ५० प्रवाशांची सुखरूप सुटका
थोर व्यक्तींच्या विचारांचे मंथन व्हावे, ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचावेत. तसेच वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात त्या विचारांचा अंगीकार व्हावा, हे विचारमंथन व्याख्यानमालेचे मुख्य उद्देश असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.