२५ गाव परिसरात वन विभागाची जनजागृती मोहीम

कल्याण: मुरबाड-अहमदनगर महामार्गावरील माळशेज घाट परिसरातील सायले, उमरोली परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने वन विभागाने या भागातील गाव परिसरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. माळशेज घाट मुख्य रस्ता लगत एक हरिण मृत आढळून आले आहे. हे हरिण बिबट्याचा बळी की एखाद्या अज्ञात वाहनाच्या धडकेत ते मरण पावले आहे याचा तपास वन विभागाचे अधिकारी घेत आहेत.

Sand Policy, Sand , Sand Auction, Scarcity ,
नागपूर : फसलेल्या वाळू धोरणाचे चटके, परराज्यातील वाळूचा पर्याय
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Effects of climate change on agriculture Global warming Cyclone
शेतकऱ्याच्या अनुभवांचे बोल मोलाचे!
Loksatta shaharbat Vasai suffers from heavy dust pollution
शहरबात: धूळ प्रदूषणाने वसईची घुसमट …
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
Sateli Gram Sabha unanimously passes resolution to ban mining
साटेली मायनिंग उत्खनन नियम धाब्यावर बसविले, ग्रामसभेत मायनिंग उत्खनन बंदचा एकमताने ठराव मंजूर!
Villages that provide agricultural land for development projects are deserted
विकास प्रकल्पांना शेतजमिनी देणारी गावे ओसाड
kolhapur tamdalge village ropvatika
लोकशिवार : रोपवाटिकेचे गाव!

भिमाशंकर, माळशेज घाट ते बारवी धरण जंगल खोरे हा विस्तीर्ण जंगल पट्टा आहे. या भागात विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. मुबलक पाणी आणि अधिवासासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून वन्यजीव माळशेज, बारवी धरण खोरे परिसराला पसंती देऊ लागले आहेत. मुबलक परस्परजीवी भक्ष्य उपलब्ध असल्याने मोठी वन्यजीव साखळी या भागात अलीकडे आढळून येऊ लागली आहे.

हेही वाचा >>> ठाणे: येऊरच्या जंगलात मादी बिबट्याचा मृत्यू

माळशेज घाट पायथ्या लगतच्या सायले, उमरोली गाव हद्दीत बिबट्याचा वावर असल्याचे या भागातील शेतकऱ्यांनी सांगितले. हरणांच्या कळपातील एका हरणाचा फडशा बिबट्याने पाडला असल्याचे ग्रामस्थ सांगतात. बिबट्याचा सायले भागात वावर असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या दुधाळ गाई, म्हशी हे पशुधन जंगलात चरण्यासाठी सोडण्यास प्रतिबंध केला आहे. बळेगाव वन परिक्षेत्राच्या वनाधिकारी अल्पना घोलप यांनी गणेश रावते, अर्जुन फोडसे, डी. डी. निकम या वनरक्षकांच्या साहाय्याने सायले, उमरोली परिसरातील २५ गावांमध्ये जाऊन गाव परिसरातील जंगलात बिबट्या आढळून आला तर घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. जंगल पट्ट्यातील रस्त्यांवर बिबट्याचा वावर असल्याने या भागात वाहन चालक, पर्यटकांनी थांबा घेऊ नये अशा सूचना प्रवाशांना देणारे फलक लावण्यात येत आहेत.

हेही वाचा >>> बारवी धरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांच्या ९९ वारसांना कडोंमपात पदस्थापना

भीमाशंकर, माळशेज घाट परिसर हा घनदाट जंगलाचा परिसर आहे. भक्ष्याचा पाठलाग करत बिबटे जंगल सोडून गाव परिसरात येतात. या भागात कुत्री इतर वन्यजीव आढळून आले की त्याच्या शोधार्थ ते गाव परिसरात भ्रमंती करतात, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. माळशेज घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला. मानवी वस्तीमधील त्याचा संचार वाढला तर या भागात नजर कॅमेरे, सापळे लावण्याचा विचार वनाधिकारी करत आहेत. गेल्या जुलै महि्न्यापासून माळशेज घाट, भिमाशंकर जंगल पट्ट्यात नर मादी बिबट्याचा संचार असल्याचे वनाधिकारी सांगतात. वर्षभरात ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी, पडघा, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, शहापूर साकडबाव, कसारा भागात बिबट्याचा संचार आढळून आला आहे.

Story img Loader