लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : मध्य रेल्वे महामार्गावरील काही महत्त्वाचे कामे करण्यासाठी शुक्रवार पासून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे रद्द करण्यात आलेल्या रेल्वे फेऱ्यांचा त्रास नोकरदार वर्गाला होऊ नये यासाठी पर्याय म्हणून ठाणे परिवहन विभागाच्या वतीने विशेष बस गाड्या सोडण्यात येत आहेत. परंतू, मेगाब्लॅाकची पूर्व सुचना असल्यामुळे अनेक नोकरदारांनी घरातून काम करणे पसंत केले तर, काहींनी स्वत:च्या वाहनांनी कार्यालय गाठले. त्यामुळे या बस गाड्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.

Information that 183 buses are closed every day in the state of Maharashtra
एसटी बसमध्ये वारंवार बिघाड… रोज १८३ बसच्या प्रवाश्यांना अडचण…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Navy speed boat, Boat accident Mumbai ,
विश्लेषण : भारताचे ‘टायटॅनिक’! ७७ वर्षांपूर्वी मुंबईजवळ रामदास दुर्घटना कशी घडली? किती भीषण? अजूनही बोट सुरक्षा वाऱ्यावर का?
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
average speed of freight trains over previous 11 years barely 25 kilometers per hour
अवघा २५ किलोमीटर सरासरी वेग… मालगाड्यांचा वेग कमी झाल्याने मालवाहतुकीवर परिणाम होत आहे का?
new Maharashtra ST bus station at Shivajinagar will feature modern conveniences and design
शिवाजीनगर बस स्थानकाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! असा होणार कायापालट

मध्ये रेल्वेच्या वतीने मेगाब्लॉक बाबतची पूर्व सुचना प्रवाशांना आधी देण्यात आली होती. तसेच या मेगाब्लॅाकचा परिणाम प्रवाशांवर होऊ नये यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला ज्यादा गाड्या सोडण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, ठाणे परिवहन विभागाने ज्यादा गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार, ठाणे परिवहन विभागाकडून ५० ज्यादा गाड्या दिवा, डोंबिवली, कल्याण, मुलुंड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून ठाणे पश्चिम सॅटील पुलावरुन या गाड्या सोडल्या जात आहेत. परंतू, मध्य रेल्वेकडून मेगाब्लाॅकची पूर्व सुचना दिल्यामुळे अनेक कार्यालयांनी जे कर्मचारी मध्य रेल्वेने प्रवास करुन कार्यालय गाठतात, अशा कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची सुचना दिली. तर, काही नोकरदारांनी स्वत:च्या किंवा खासगी वाहनाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, परिवहन विभागाकडून सोडण्यात आलेल्या ज्यादा बस गाड्यांसाठी प्रवाशांची फार गर्दी नसल्याचे दिसून आले.

आणखी वाचा-महामेगाब्लॉकचा ताप टाळण्यासाठी नोकरदारांचे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य, लोकल अर्धा तास उशिराने

ज्यादा बस गाड्या कोणत्या?

मेगाब्लॉकमुळे ठाणे परिवहन विभागाकडून ज्यादा बस गाड्या सोडण्यात आल्या. परंतू, या बस गाड्या नेहमीच्या मार्गावरील काही फेऱ्या रद्द करुन सोडल्या तर, नाही ना असा प्रश्न ठाण्यात काम करणाऱ्या नोकरदारांमध्ये निर्माण झाला होता. कारण, या फेऱ्यांमुळे शहरांतर्गत वाहतूकीवर परिणाम होईल अशी शक्यता काही प्रवाशांच्या मनात आली होती. मात्र, ठाणे शहरात दररोज ३०० ते ३५० बस गाड्या वेगवेगळ्या मार्गावर धावतात. या नेहमीच्या बस गाड्या व्यतिरिक्त ५० ज्यादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे शहरांतर्गत वाहतुक व्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.

मेगाब्लॉकमुळे ठाणे परिवहन विभागाकडून विविध मार्गावर ५० ज्यादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत. परंतू, नोकरदार वर्गाला मेगाब्लाॅकची पूर्व सुचना असल्यामुळे त्यांनी घरातून काम करण्यास पसंती दिली. त्यामुळे या गाड्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. तसेच शहरा अंतर्गत बस वाहतुक सुरळित सुरु आहे, या ज्यादा बस गाड्यांचा त्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. -भालचंद्र बेहेरे, परिवहन व्यवस्थापक, ठाणे महापालिका

Story img Loader