लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील प्रवाशांना स्कायवॉकवर आणि तेथून रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी साहाय्य करणारे उदवहन मागील तीन दिवसांपासून बंद आहे. दर महिन्यातून हे उदवहन चार ते पाच दिवस बंद राहत असल्याने प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

Dhananjay Munde
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? कृषी साहित्य खरेदीप्रकरणी कोर्टात सुनावणी; वाढीव दर आकारल्याचा याचिकाकर्त्याचा दावा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Kalyan Dombivli is free from drunkards ganja users and criminals due to police action at night
रात्रीची मद्यधुंद, तर्र कल्याण-डोंबिवली रस्ते, झुडपांमधून गायब
online fraud with Bank officer on name of share trading
शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बँक अधिकाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक
saudi arabia snowfall
सौदी अरेबियाच्या रखरखीत वाळवंटात झाली चक्क बर्फवृष्टी; कारण काय?
sakal hindu samaj, Ganapati temple , Siddhatek ,
अहिल्यानगर : सिद्धटेक येथील गणपती मंदिराजवळचे वादग्रस्त बांधकाम सकल हिंदू समाजाकडून जमीनदोस्त
Two women fight at Ramnagar police station in Dombivli
डोंबिवलीत रामनगर पोलीस ठाण्यात दोन महिलांमध्ये केसाच्या झिंज्या उपटून मारामारी
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

हे उदवहन बंद असले की या उदवहनाच्या समोर दुचाकी स्वार आपली वाहने उभी करतात. काही फेरीवाले उदवहनच्या आतील भागाचा वापर आपले सामान ठेवण्यासाठी करतात. पावसाळ्यात या उदवहनच्या तळभागाला पावसाचे पाणी जाऊन उदवहन सतत बंद पडायचे. आता पाऊस-पाणी नसताना उदवहन सतत बंद राहत असल्याने प्रवासी, नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

आणखी वाचा-एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे ऐवज चोरणारा चोरटा भिवंडी रेल्वे स्थानकातून अटक

उदवहन बंद असले की प्रवाशांना रेल्वे स्थानकात जाण्यासाठी स्कायवॉकच्या पायऱ्या चढून जावे लागते. काही प्रवाशांना हदयरोग, छाती दुखण्याचे आजार, काहींना पायऱ्या चढल्या की दम लागतो, अशा आजारी रुग्ण, प्रवासी, नागरिक, ज्येष्ठ, वृध्द यांना डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकातील उदवहन हा मोठा आधार आहे. उदवहन बंद असले की आजारी रुग्ण प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होते. त्यांना जीव धोक्यात घालून जिन्यांवरून हळूहळू जावे लागते.

सकाळच्या वेळेत लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असलेल्या प्रवाशांना पूर्व भागातील रेल्वे स्थानकाजवळील उदवहन हा मोठा आधार असतो. उदवहनमुळे जिने चढण्याचा त्रास वाचतो. आणि झटपट प्रवासी फलाटावर पोहचात. मागील तीन दिवसांपासून उदवहन बंद असल्याने प्रवाशांचा हिरमोड होत आहे. अनेक प्रवासी उदवहनजवळ येत आहेत. परंतु, ती बंद असल्याचे पाहून त्यांना वळसा घेऊन जिन्याने रेल्वे स्थानकात जावे लागते.

आणखी वाचा-शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली बँक अधिकाऱ्याचीच ऑनलाईन फसवणूक

उदवहन स्थानिक तंत्रज्ञांनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण तो झाला नाही. उदवहन ज्या कंपनीची आहे. त्या कंपनीचे तंत्रज्ञ येतील तेव्हाच हे उदवहन दुरुस्त केले जाईल. ते केव्हा येतील, याची कोणतीही माहिती नाही. आम्ही उदवहन बंद असल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला आहे, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

‘उदवहन वारंवार बंद पडत असेल तर रेल्वे प्रशासनाने नियंत्रक कंपनीला त्यांचे उदवहन काढण्यास सांगावे. नवीन कंपनीला निमंत्रित करावे. त्यांच्याकडून नवीन उदवहन बसून घेऊन त्यांच्याकडे उदवहन देखभाल दुरुस्तीचे काम द्यावे. उदवहन बंद पडले तरी आपणास कोणी काय बोलत नाही असा नियंत्रक उदवहन कंपनी तंत्रज्ञांचा गैरसमज आहे. आपल्या चालढकलपणामुळे प्रवाशांना किती त्रास होतो याची जाणीव त्यांनी ठेवावी,’ असे उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी सांगितले.

Story img Loader