पण अंतरे मोजण्यासाठी सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर या एककांचा उपयोग करतो. परंतु आकाशातील अंतरे मोजण्यासाठी ही एकके खूप तोकडी पडतात. म्हणून ‘प्रकाशवर्ष’ हे एकक आकाशातील अंतरे मोजण्यासाठी वापरतात.
प्रकाशकिरणाचा वेग एका सेकंदास तीन लक्ष किलोमीटर एवढा आहे. प्रकाशकिरण एका सेकंदात जेवढे अंतर जातो त्या, तीन लक्ष कि.मीटर अंतरास ‘एक प्रकाश सेकंद’ म्हणतात. प्रकाश किरण एका मिनिटात जेवढे अंतर जातो त्या अंतरास ‘एक प्रकाश मिनिट’ म्हणतात. प्रकाश किरण एक तासात जेवढे अंतर जातो त्या अंतरास ‘एक प्रकाश तास’ म्हणतात. प्रकाश किरण एका वर्षांत जेवढे अंतर जातो त्या अंतराला ‘एक प्रकाश वर्ष’ म्हणतात. (सोबत दिलेला तक्ता पाहा.) सोप्या भाषेत सांगायचे तर मित्र तारकेपासून प्रकाश किरण पृथ्वीवर येण्यासाठी ४.३ वर्षे लागतात. व्याध तारकेपासून प्रकाशकिरण पृथ्वीवर येण्यासाठी ६५ वर्षे लागतात. वेगळ्या भाषेत सांगायचे तर आपण जी व्याध तारका पाहतो ती ६५ वर्षांपूर्वीची पाहत असतो. पृथ्वीला सर्वात जवळची म्हणून देवयानी दीर्घिका ओळखली जाते. छोटय़ा दुर्बिणीतूनही ही दीर्घिका छान दर्शन देत असते. देवयानी दीर्घिकेपासून निघालेला प्रकाशकिरण आपल्यापर्यंत येण्यासाठी तेवीस लक्ष वर्षे लागतात. आकाशातील या अंतराची आपणास कल्पना आली की आपण थक्क होऊन जातो.
तारकांची तेजस्विता
काळोख्या रात्री आपण आकाशात ज्या वेळी ग्रह-तारकांचे निरीक्षण करतो त्या वेळी काही तारका तेजस्वी दिसतात तर काही अंधुक दिसतात. तारकांकडून कमी प्रकाश प्रक्षेपित होत असेल तर त्या अंधुक दर्शन देतात किंवा त्या तारका आपल्यापासून खूप दूर असतील तर त्या अंधूक दिसतात.
तारकांच्या तेजाच्या प्रती दोन प्रकारे सांगण्यात येतात.
१) दृश्य प्रत : इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकात हिप्पार्कसने प्रथम तारकांच्या तेजाप्रमाणे प्रत लावण्याचा प्रयत्न केला. त्याने ठळक दिसणाऱ्या तारकांना ‘पहिली’ प्रत दिली आणि नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या अंधुक तारकांना ‘सहा’ प्रत दिली. परंतु त्यासाठी काही खास नियम नव्हता. सन १८५६ मध्ये नॉर्मन पॉगसन या शास्त्रज्ञाने तारकांची प्रत निश्चित करण्यासाठी शास्त्रीय पद्धत शोधून काढली. या पद्धतीप्रमाणे पहिल्या प्रतीच्या तारकेकडून सहाव्या प्रतीच्या तारकेपेक्षा शंभर पट प्रकाश पृथ्वीकडे येतो असे समजण्यात येते.
सूर्य- (वजा) २६.५ प्रत.
पौर्णिमेचा चंद्र (वजा) १२.५  प्रत. व्याध (वजा) १.४६ प्रत.
मित्र (वजा) ०.०१ प्रत.
स्वाती (वजा) ०.०६ प्रत.
अभिजित (अधिक) ०.०३ प्रत.
चित्रा (अधिक) १.०४ प्रत.
२) निरपेक्ष प्रत : दृश्य प्रतीमुळे तारकेची खरी तेजस्विता कळत नाही. म्हणून निरपेक्ष प्रत सांगितली जाते.
कोणतीही तारका ३२-६ प्रकाश वर्षे अंतरावर असताना किती तेजस्वी दिसेल त्या प्रतीला ‘निरपेक्ष प्रत’ म्हणतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

’एक प्रकाश सेकंद = ३ लक्ष कि.मीटर
’एक प्रकाश मिनिट = ३ लक्ष x ६० कि.मीटर
’एक प्रकाश तास = ३ लक्ष x ६० x ६० कि.मीटर
’एक प्रकाश वर्ष = ३ लक्ष x ६० x ६० x २४ x ३६५ कि.मीटर
’चंद्र पृथ्वीपासून (सरासरी) = १.३ प्रकाश सेकंद अंतरावर आहे.
’सूर्य पृथ्वीपासून (सरासरी) = ८.३ प्रकाश मिनिटे अंतरावर आहे.
’प्लुटो पृथ्वीपासून (कमीत कमी अंतर) = ५.३ प्रकाश तास अंतरावर आहे.
’मित्र तारका = ४.३ प्रकाशवर्षे
’व्याध तारका = ८.६ प्रकाशवर्षे
’रोहिणी तारका = ६५ प्रकाशवर्षे
’चित्रा तारका = २६० प्रकाशवर्षे
’अगस्ती तारका = ३१० प्रकाशवर्षे
’देवयानी दीर्घिका = २३ लक्ष प्रकाशवर्षे

’एक प्रकाश सेकंद = ३ लक्ष कि.मीटर
’एक प्रकाश मिनिट = ३ लक्ष x ६० कि.मीटर
’एक प्रकाश तास = ३ लक्ष x ६० x ६० कि.मीटर
’एक प्रकाश वर्ष = ३ लक्ष x ६० x ६० x २४ x ३६५ कि.मीटर
’चंद्र पृथ्वीपासून (सरासरी) = १.३ प्रकाश सेकंद अंतरावर आहे.
’सूर्य पृथ्वीपासून (सरासरी) = ८.३ प्रकाश मिनिटे अंतरावर आहे.
’प्लुटो पृथ्वीपासून (कमीत कमी अंतर) = ५.३ प्रकाश तास अंतरावर आहे.
’मित्र तारका = ४.३ प्रकाशवर्षे
’व्याध तारका = ८.६ प्रकाशवर्षे
’रोहिणी तारका = ६५ प्रकाशवर्षे
’चित्रा तारका = २६० प्रकाशवर्षे
’अगस्ती तारका = ३१० प्रकाशवर्षे
’देवयानी दीर्घिका = २३ लक्ष प्रकाशवर्षे