डोंबिवली – डोंबिवली पूर्व भागातील सुनीलनगर भागातील ध. ना. चौधरी भागातील रस्त्यांवरील झाडांवर या भागातील नवरात्रोत्सव मंडळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे आणि कल्याण डोंबिवली पालिकेच्या परवानग्या न घेता विद्युत रोषणाई केली आहे. अशाप्रकारची रोषणाई करण्यास उच्च न्यायालयाने प्रतिबंध केला आहे. तरीही स्थानिक नवरात्रोत्सव मंडळांनी अशाप्रकारची झाडांवर विद्युत रोषणाई करून झाडांना हानी पोहचविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नवरात्रोत्सवनिमित्त सुनीलनगरमधील ध. ना. चौधरी विद्यालयाचा परिसर विद्युत रोषणाईने सुशोभित करण्यात आला आहे. ही रोषणाई करताना मुंबई उच्च न्यायलयाचे प्रतिबंधात्मक आदेश आहेत. हे माहीत असूनही नवरात्रोत्सव मंडळ आणि मंडप डेकोरेटर्सने अशाप्रकारची रोषणाई केल्याने स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी मंडळी नाराजी व्यक्त करत आहेत. चौधरी विद्यालय परिसरात जुनाट डेरेदार वृक्ष आहेत. विविध प्रकारचे पक्षी, कीटक, जैवविविधता या झाडांवर आहे. पक्ष्यांची या भागातील झाडे ही रात्रीची निवासस्थाने आहेत. या झाडांवर रोषणाई केल्याने त्यांच्या अस्तित्व आणि अधिवासाला नवरात्रोत्सव मंडळांनी धक्का पोहचविला आहे, अशा तक्रारी पर्यावरणप्रेमींनी केल्या.

good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
banana cultivation farmer kiran gadkari tried different experiment for banana farming
लोकशिवार: आंतरपिकातील यश !

हेही वाचा – डोंबिवलीत महावितरणच्या साहाय्यक अभियंत्याला जीवे ठार मारण्याची धमकी

झाडे हा एक जीव आहे. विविध प्रकारची जैवविविधता या झाडांंच्या आधाराने राहत असते. त्यामुळे झाडांना विद्युत रोषणाई करून कोणालाही इजा करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे कोणीही ढाबा, हाॅटेल चालक, सभा मंडपवाले झाडांंना विद्युत रोषणाई करत असतील तर त्यांनी ती स्वत:हून काढून टाकण्याचे आणि स्थानिक संबंधित पालिकांनी आपल्या हद्दीतील एकाही झाडांवर विद्युत रोषणाई केली जाणार नाही यादृष्टीने दक्षता घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. गेल्या जुलै ते ऑगस्ट या कालावधीत मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण क्षेत्रातील सर्व महापालिकांनी झाडांवर व्यावयासिकांनी केलेली रोषणाई काढून टाकण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेने आपल्या हद्दीतील झाडे विद्युत रोषणाई मुक्त केली होती.

डोंबिवलीतील सुनीलनगर भागात नवरात्रोत्सव मंडळांनी कल्याण डोंबिवली पालिकेला अंधारात ठेऊन, उच्च न्यायालयाच्या आदेशांना न जुमानता डौलदार वृक्षांवर विद्युत रोषणाई केल्याने संबंधित नवरात्रोत्सव मंडळ आणि विद्युत रोषणाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

हेही वाचा – डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकावरील पुलाच्या पोहच रस्त्याने बाधितांच्या पुनर्वसनासाठी ८४ कोटींचा प्रस्ताव

अधिक माहितीसाठी कल्याण डोंबिवली पालिका उद्यान विभागाचे मुख्य अधीक्षक संजय जाधव यांना संपर्क साधला. ते एका कार्यक्रमात व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पालिकेच्या एका अधिकाऱ्याने मात्र अशाप्रकारे न्यायालयाचा आदेश दुर्लक्षित करून झाडांवर विद्युत रोषणाई करण्यात आली असेल तर ती रोषणाई संबंंधित नवरात्रोत्सव मंडळाला काढून टाकण्याचे आदेश दिले जातील. त्याने ती रोषणाई काढण्यास टाळाटाळ केली तर त्यांच्यावर वृक्ष संवर्धन कायद्याने गुन्हा दाखल केला जाईल.