ठाणे : साक्षरतेमुळे भ्रष्टाचार वाढत चालला आहे. निरक्षर असल्यास तो गाव, घरापर्यंत फसवणूक करतो. पण सगळ्या देशाला फसवणे हे साक्षरतेमुळे होत आहे. आता अशी वेळ आली आहे की, ‘साक्षरतेपेक्षा निरक्षरता वाढवा’ असे म्हणावे लागले आणि यासाठी विद्यापीठे स्थापन करावी लागतील, अशी उपहासात्मक टिप्पणी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना केली.

ग्रंथाली संस्थेचा सुवर्णमहोत्सवी वाचकदिन ठाण्यातील तीन हात नाका येथील हिंदुहृद्यासम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात आयोजित करण्यात आला होता. महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी ज्ञानपीठविजेते लेखक डॉ भालचंद्र नेमाडे यांचे चित्र रेखाटण्यात आले. ठाण्यातील चित्रकार विजय बोधनकर यांनी नेमाडे यांचे चेहऱ्यावरील हावभाव, त्यांचा जीवन कारकीर्दीतील लेखणी यांचा मेळ साधत रंगांची उधळण करत त्यांचे व्यक्तिचित्र काढले. यावेळी चित्र रेखाटत असताना डॉ. नेमाडे यांची मुलाखत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी घेतली.

Sai Pallavi reacts on turning vegetarian for Sita role in Ramayana
‘रामायण’ सिनेमासाठी मांसाहार सोडल्याचे वृत्त पाहून भडकली साई पल्लवी; कायदेशीर कारवाईचा इशारा देत म्हणाली…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Nikki Giovanni
व्यक्तिवेध : निक्की जियोव्हानी
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Success Story Of Sandeep Jain
Success Story Of Sandeep Jain :कठीण विषय शिकवला सोप्या भाषेत, ब्लॉगचे झाले ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये रूपांतर; वाचा संदीप जैन यांची गोष्ट
Sane Guruji , book Sane Guruji Jeevan Gatha,
‘साने गुरुजींची जीवनगाथा’ आता ‘श्रवणीय’
loksatta readers response
लोकमानस : हे केवळ चुकांवर पांघरूण
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम

हेही वाचा >>> Vinod Kambli Heath: “कल खेल में, हम हो ना हो…”, विनोद कांबळींची रुग्णालयातून भावनिक प्रतिक्रिया, प्रकृतीत सुधारणा; रुग्णालयातून दिला चाहत्यांना संदेश!

नेमाडे यांनी कविता हा माझा आवडता वाङमय प्रकार आहे. मात्र ते करण्याची संधी कमी मिळाली अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तुम्ही जितके साक्षर होता तितके मूर्ख आणि नालायक होता असेही ते म्हणाले. तसेच या वेळी त्यांनी त्यांच्या सट्टक आणि देखणी या कविता संग्रहातील काही कवितांचे वाचन केले.

आपल्या देशात सगळ्यात वाईट परिस्थिती स्त्रियांची आहे. महिलांवर होणारे बलात्कार, शोषण अशा समस्यांवर आधारित कवितेच्या माध्यमातून बोलण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी सांगितले. धर्म- जात यापेक्षा माणुसकी हा खरा धर्म आहे, असेही ते म्हणाले.

चार कवितासंग्रहाचे प्रकाशन

या कार्यक्रमास डॉ. नेमाडे यांच्या पत्नी प्रतिभा नेमाडे आणि नातू प्रणात नेमाडे हे उपस्थित होते. या वेळी बाल कलाकार कौस्तुभ सुतार यानेही नेमाडे यांचे चित्र रेखाटले. तर या कार्यक्रमावेळी चार कवींच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कवी नीलकंठ कदम यांचे ‘आस्वाद आणि समीक्षा’, किरण येले यांचे ‘बाईच्या कविता भाग २’, मोहन काळे यांचे ‘अखेर मी माझीच समजून घातली’ आणि महेंद्र कोंडे यांच्या ‘बिलोरी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन या वेळी पार पडले.

Story img Loader