कल्याण: मध्य रेल्वेच्या कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या जमिनीवर रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या गाड्या, लोकल आणि मालगाड्या यांच्यासाठी  थांबा ठिकाणे( यार्ड) स्वतंत्र विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. या पुनर्विकसित करण्यात येत असलेल्या तिन्ही प्रकल्पांची मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवाणी यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीश कुमार गोयल उपस्थित होते.

कल्याण रेल्वे स्थानकात देशाच्या दक्षिण पूर्व आणि ईशान्य दिशेकडून मेल, एक्सप्रेस गाड्या धावत असतात. याशिवाय खोपोली,  कसारा ते मुंबई अशा लोकल गाड्या धावतात. कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मध्ये रेल्वेची सुमारे १०० हून अधिक एकर जमीन आहे. या जमिनीवर मालगाडी, एक्सप्रेस थांबा आणि बाजूलाच मुख्य रेल्वे मार्गीकेवर लोकल थांबा आहे. हे थांबे विस्कळीत असल्याने रेल्वेने या तिन्ही थांब्यांचे पुनर्नूतनीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. या कामांमुळे एक्सप्रेस, मेल गाड्या आणि लोकल यांची स्वतंत्र थांबा ठिकाणे असणार आहेत. हे प्रकल्प कल्याण रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूकडे रेल्वेच्या जमिनीवर सुरू आहेत. या प्रकल्पांची सद्य परिस्थिती पाहण्यासाठी महाव्यवस्थापक गोयल गुरुवारी आपल्या सहकारी अधिकाऱ्यांसह कल्याण येथे आले होते.

Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
traffic servants Dombivli, concrete road work Dombivli,
डोंबिवलीत काँक्रीट रस्ते कामांच्या ठिकाणी वाहतूक सेवकांची फौज
Central Railway, Central Railway crowd Planning,
रेल्वे गाड्यांच्या डब्यात बदल
long discussed issue of widening Katraj to Kondhwa road is gradually being resolved
कात्रज कोंढवा रस्त्याबाबत मोठी अपडेट, जागा ताब्यात देण्यासाठी आले इतके प्रस्ताव..!
railways amendment bill introduced in lok sabha opposition urges govt not to privatise railways
लोकसभेत रेल्वे (सुधारणा) विधेयक सादर; खासगीकरण न करण्याची विरोधकांची मागणी
Work on third and fourth railway lines at Kalyan Ambernath and Badlapur stations gained momentum
तिसऱ्या चौथ्या मार्गिकेतील महत्वाच्या टप्प्याला गती, मार्गिकेतील लहान मोठ्या पुलांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर

हेही वाचा >>> सरस्वती वैद्य हत्याकांड : साने विरोधात १२०० पानांचे दोषारोपत्र दाखल

प्रस्तावित कामे

मेल-एक्स्प्रेस आणि उपनगरीय लोकल गाड्यांची वाहतूक विभक्त करण्यासाठी कल्याण गुड्स यार्ड येथे चार नवीन नवीन कोचिंग फलाट बांधण्यात येणार आहेत. जमीन सपाटीकरण, अंतर्गत छोटे पूल बांधण्यात येणार आहेत. मालगाडी स्वतंत्र मार्गीकेसाठी पहिल्या टप्प्यातील बांधकामामध्ये गटार आणि सीमाभिंतीचे काम, मातीचे काम प्रगतीपथावर आहे. सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रभावित सेवा इमारती आणि कर्मचारी निवास पुनर्वसनसाठी कंत्राट देण्यात आले आहे.

हेही वाचा >>> कल्याण: मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांचे निधन

प्रस्तावित ट्रॅकच्या अलाइनमेंटमध्ये येणाऱ्या सेवा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. १० सेवा इमारतींपैकी ८ इमारतींचे काम प्रगतीपथावर असून, यामध्ये ८ इमारतींच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. ट्रॅकशी संबंधित कामांचे कंत्राट देण्यात आले आहे. यार्डातील जुने रेल्वे मार्ग तोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जवळपास ९० टक्के तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. कल्याण यार्डची पाहणी केल्यानंतर नरेश ललवानी यांनी कल्याण एसी इलेक्ट्रिक लोको शेडची पाहणी केली.

Story img Loader