लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहिता लागू असताना या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील अनेक ठिकाणी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या पक्ष कार्यालयांवरील पक्षाचे नाव, चिन्ह अद्यापही नियमानुसार झाकले नाही. भाजपने वर्तकनगर येथे कार्यालय स्थापन केले आहे. या कार्यालयावरील भाजपचे नाव ठळक अक्षरात दिसत आहे. टेंभीनाका भागातही असेच चित्र आहे.
लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून त्यानुसार आता आदर्श आचारसंहिता देखील लागू झाली आहे. या आचारंसहितेचे पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज संस्थामधील अधिकारी कार्यरत आहेत. या कालावधीत पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आचारसंहितेचे पालन करावे लागते. त्यासाठी मार्गदर्शकतत्त्वे लागू करण्यात आली आहेत. पक्ष कार्यालयावर नेते, पक्षाचे नाव, चिन्ह असल्यास ते झाकण्याच्या सूचना केल्या जातात. नियमानुसार काही नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयाची नावे झाकली आहेत. तर काही पदाधिकारी अद्यापही आचारसंहितेच्या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
आणखी वाचा-भिवंडीत मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांकडून अमान्य
वर्तकनगर येथील रेमंड परिसरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी गुढीपाडव्या निमित्ताने भाजपच्या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटन केले. या कार्यालयावर भारतीय जनता पक्ष असे ठळक अक्षरांममध्ये लिहीण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठ्या आकारातील छायाचित्र प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आले आहे. उद्घटनाचा दुसरा दिवस उजाडल्यानंतरही दुपारपर्यंत या कार्यालयावरील नाव झाकण्यात आले नव्हते. अशाचप्रकारे चरई भागात शिंदे यांच्या शिवसेनेच्या टेंभीनाका-चरईच्या शाखाप्रमुखाचे कार्यालय आहे. या कार्यालयावरील फलक झाकण्यात आलेले नाही. या फलकावर शिवसेनेच्या मुख्य पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र आहे. उथळसर येथे शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेविकेचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या दर्शनीभागाचे फलक झाकण्यात आले असले तरी एक दिशेकडून शिवसेना हे नाव स्पष्ट दिसत आहे. ठाण्यातील टेंभी नाका येथे आनंद आश्रमावर देखील पक्षाचे नाव आहे. आनंद आश्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका, पत्रकार परिषद होत आहेत. असे असतानाही निवडणूक अधिकाऱ्यांकडून या बाबत कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.
आणखी वाचा-चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
भाजपच्या कार्यालयाबाबत येथील निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले असता, संबंधित बाब निदर्शनास आल्यानंतर पक्षाचे नाव आणि चिन्ह झाकण्याचे कारवाई सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांना संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.