गडकरी रंगायतनमध्ये आज विभागीय अंतिम फेरी; सर्वासाठी प्रवेश खुला

आशयपूर्ण संहिता आणि अभिनयातील ताजेपणा असलेल्या पाच दर्जेदार एकांकिका पाहण्याची संधी ठाणेकरांना चालून आली आहे. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी आज, शनिवारी दुपारी साडेतीन वाजल्यापासून ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार पडणार असून या पाचपैकी सर्वोत्तम एकांकिका ‘लोकांकिका’च्या महाअंतिम फेरीत पोहोचणार आहे. तरुणाईतील निद्रानाश, मानवी नातेसंबंध, धार्मिक अवडंबर, वैज्ञानिक दृष्टिकोन, आरक्षणाचा प्रश्न अशा वेगवेगळ्या सामाजिक, मानसिक प्रश्नांचा वेध घेणाऱ्या या एकांकिकांमधून ठाण्याची ‘लोकांकिका’ कोणती ठरणार, याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

ठाणे विभागीय अंतिम फेरीत सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे प्रस्तुत ‘चौकट’, मॉडेल महाविद्यालय, डोंबिवली प्रस्तुत ‘टिळा’, कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय, उरण प्रस्तुत ‘जो बाळा जो जो रे जो’, सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर प्रस्तुत ‘सेंट्री’ आणि  बी.के.बिर्ला महाविद्यालय, कल्याण प्रस्तुत ‘कपल गोल्स’ या महाविद्यालयांचा समावेश आहे. ठाणे प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या या पाच महाविद्यालयांची जोरदार तयारी सुरू आहे.  प्राथमिक फेरीत झालेल्या चुका, परीक्षकांनी सुचवलेले मुद्दे यावर अधिक मेहनत घेत एकांकिकेतील विद्यार्थी एकांकिका सवरेत्कृष्ट होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ‘एकांकिकां’च्या दिग्दर्शकांनी सांगितले. वाक्य, संवाद यावर अधिक भर दिला जात असताना दुसरीकडे नेपथ्य, प्रकाशयोजना, वेशभूषा आणि रंगभूषा यादेखील गोष्टींवर संबंधित विभागाचे विद्यार्थी मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 पालक आणि शिक्षकांमध्येही उत्साह

‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि अंतिम फेरीत निवड झालेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहेच, पण त्याचबरोबर तालमीसाठी विरोध करणाऱ्या पालकांनीही ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेत सहभागी झालेल्या आपल्या पाल्यांना वेशभूषा, तसेच नेपथ्यासाठी उपयोगी पडणारे घरातील सामान त्यांना वापरण्यासाठी दिले आहे. उरणच्या कोकण ज्ञानपीठ प्राचार्य, महाविद्यालयाचे संस्थापक विभागीय अंतीम फेरीसाठी उपस्थित राहणार आहेत. ज्ञानसाधना महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक आणि प्राचार्यदेखील उपस्थित राहणार आहेत. कल्याण येथील बी.के. बिर्ला महाविद्यालयातील एकांकिकेत काम करमारे विद्यार्थी ग्रामाीण भागातील आहेत. त्यांच्या पालकांनी कधीच रंगमंच पाहिला नाही. मात्र विभागीय अंतीम फेरीच्या निमीत्ताने पालक पहिल्यांदाच गडकरी रंगायतनाचा भव्य रंगमंच पाहण्याचा अनुभव ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या माध्यमातून घेणार आहेत.

प्रायोजक

‘सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत’, ‘केसरी टूर्स’ आणि ‘पितांबरी’ सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेन्ट हंट पार्टनर ‘आयरिस प्रॉडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या या स्पर्धेचे टेलिकास्ट पार्टनर ‘झी मराठी’ आणि न्यूज पार्टनर ‘एबीपी माझा’ आहेत.

‘लोकांकिका’ पाहायला येताय ना?

* कुठे? : गडकरी रंगायतन, ठाणे

* कधी? : शनिवार, ८ डिसेंबर, दुपारी ३.३० वा. पासून

* प्रवेश विनामूल्य, काही जागा निमंत्रितांसाठी