ठाणे : विविध सामाजिक विषयांना उत्तम कथा, अभिनय आणि संगीताची साथ देत उत्कृष्ट एकांकिकेचे सादरीकरण ठाणे विभागीय प्राथमिक फेरीत झाले. या एकांकिकांमुळे ठाणे विभागीय प्राथमिक फेरी अत्यंत चुरशीची ठरली. यातून पाच एकांकिकांची ठाणे विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली असून ही फेरी आज शनिवारी सकाळी ९.४५ वाजल्यापासून ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात रंगणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राथमिक फेरीत एकांकिका सादरीकरणानंतर परीक्षकांनी दहा ते पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांना त्यांच्या एकांकिकेतील त्रुटींबरोबरच काय बदल करायला हवेत, याविषयी मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने एकांकिकेत आवश्यक ते बदल करण्यासह सहिंतेचे वाचन, अभिनयाची तालीम तसेच तांत्रिक गोष्टींवर भर देऊन ठाणे विभागीय अंतिम फेरी गाजवण्यासाठी महाविद्यालये सज्ज झाली आहेत.

हेही वाचा :लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तालीम अंतिम टप्प्यात

लोकांकिका हा एक उत्तम मंच आहे. त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी अनुभव घेणे गरजेचे आहे. या स्पर्धेत दरवर्षी वेगळे विषय पहायला मिळतात. अनेक दिग्गज ही स्पर्धा बघायला येतात कारण या स्पर्धेने ती उंची राखलेली आहे. तसेच जे स्पर्धक आहेत त्यांनी याआधी ज्या एकांकिका विजेत्या ठरल्या आहेत त्यांच्याकडून काही शिकणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी लोकांकिका हा एक वर्ग आहे.

डॉ. श्वेता पेंडसे, लेखिका व अभिनेत्री

लोकसत्ताचा ‘लोकांकिका’ हा अतिशय उत्तम उपक्रम आहे. या स्पर्धेतून शिकण्यासारखे खूप असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेचा नक्कीच उपभोग घ्यावा. बरेचसे लेखक हे कलाकारांमधूनच तयार होतात. अभिनय आणि भाषेवर आणखी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या स्पर्धेतून रंगकर्मी तर घडतातच पण एक दर्जेदार प्रेक्षकही यातूनच घडतात.

संतोष पवार, लेखक, दिग्दर्शक व अभिनेते

हेही वाचा : वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी नष्ट; भिवंडीतील कशेळी, दिवे-अंजूर खाडीत महसुल विभागाची कारवाई

विभागीय अंतिम फेरीतील पाच एकांकिका

●‘कुक्कुर’ : ज्ञानसाधाना महाविद्यालय, ठाणे

●‘रेशन कार्ड’ : एनकेटी महाविद्यालय, ठाणे

●‘क्रॅक्स इन द मिरर’ : जोशी-बेडेकर महाविद्यालय, ठाणे

●‘ऑपरेशन’ : एसएसटी महाविद्यालय, उल्हासनगर

●‘वेदना सातारकर…हजर सर’ : सी. के. ठाकूर महाविद्यालय, पनवेल</p>

हेही वाचा : अतिक्रमण कारवाईत दुजाभाव ?

सर्वांना प्रवेश, काही जागा निमंत्रितांसाठी राखीव

● ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची ठाणे विभागीय अंतिम फेरी शनिवार, १४ डिसेंबर रोजी सकाळी ९.४५ वाजल्यापासून ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे रंगणार आहे.

● याच ठिकाणी प्रेक्षकांना नि:शुल्क प्रवेशिका विभागीय अंतिम फेरी सुरू होण्याच्या अर्धा तास आधी देण्यात येतील.

● एका व्यक्तीला एकच प्रवेशिका देण्यात येईल. तर काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असतील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta lokankika thane final round today at ghanekar natyagruha thane css