‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ कार्यशाळेतून उत्तर मिळणार; ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचेही मार्गदर्शन
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या विश्वात योग्य करिअरची निवड करणे अतिशय गरजेचे आहे. जागतिकीकरणामुळे जवळ आलेल्या विश्वात करिअरच्या अगणित संधी आहेत. परंतु त्यांची माहिती विद्यार्थ्यांना असतेच असे नाही. हीच माहिती सांगण्यासाठी आणि करिअर क्षेत्रांची, संधींची ओळख करून देण्यासाठी बुधवारी आणि गुरुवारी (५ आणि ६ जून) रोजी ठाण्यात टिपटॉप प्लाझा येथे ‘लोकसत्ता’तर्फे ‘मार्ग यशाचा’ ही करिअर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
‘आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स प्रस्तुत ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेचे उद्घाटन ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेत विविध विषयांतील तज्ज्ञ विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी ‘करिअर निवडीतील ताण’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधतील, तर वैद्यकीय क्षेत्रातील करिअरविषयी डॉ. सागर मुंदडा आणि डॉ. अमोल अन्नदाते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. विधि शिक्षणाविषयी प्रा. नारायण राजाध्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. वेबविश्वातील करिअरसंदर्भात भारतीय डिजिटल पार्टी अर्थात भाडिपाचे सारंग साठय़े आणि समाजमाध्यमांत ‘इन्फ्लूएन्सर’ असलेल्या ब्लॉगर प्रिया आडिवरेकर हे मार्गदर्शन करतील. तसेच संवाद-पटकथा लेखन या विषयावर सचिन दरेकर हे विद्यार्थी-पालकांशी संवाद साधतील. ‘एबीपी माझा’च्या पत्रकार ज्ञानदा कदमटीव्ही पत्रकारितेच्या ग्लॅमरमागची मेहनत उलगडून सांगतील. याचसोबत करिअर समुपदेशक विवेक वेलणकर ‘करिअर निवडीच्या टप्प्यावर’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
या सर्व तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळेल. सोबतच आपल्या मनातील शंकांचे समाधानही करून घेता येईल.
लक्षात ठेवा
- या कार्यशाळेसाठी प्रत्येकी ५० रु. नोंदणी शुल्क आहे.
- खालील ठिकाणी स. १०.०० ते संध्याकाळी ५.०० या वेळात प्रवेशिका मिळू शकतील.
- जिन्स जंक्शन, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
- टिपटॉप प्लाझा, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड चेक नाक्याजवळ, ठाणे
- लोकसत्ता कार्यालय, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, कॉसमॉस बँकेवर, नवजीवन रक्तपेढीच्या शेजारी, नौपाडा, ठाणे (प.)
- त्याचबरोबर पुढील लिंकवरूनही विद्यार्थी ऑनलाइन नोंदणी करू शकतात. http://tiny.cc/margyashacha2019thane
प्रायोजक
कार्यशाळेचे ‘टायटल स्पॉन्सर’ आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स असून सहप्रायोजक विद्यालंकार क्लासेस आहेत, तर एनएमआयएमएस स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, एज्युकेशन ओव्हरसीज, सासमिरा, गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, युक्ती हे पॉवर्ड बाय पार्टनर असून स्टेट बँक ऑफ इंडिया बँकिंग पार्टनर आहेत.