गेल्या २३ जानेवारीपासून ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या शहरांत सुरू असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या शहरांतील १७० शोरूम्समधून खरेदी करून बक्षिसे जिंकण्याची ग्राहकांना रविवापर्यंत संधी आहे. ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान या फेस्टिव्हलमध्ये विजेते ठरलेल्या भाग्यवंतांना मंगळवारी ठाण्यातील बी-केबीन येथील ‘वीणा वर्ल्ड’च्या कार्यालयात गौरवण्यात आले. ‘वंशवेल’, ‘स्वराज्य’ या चित्रपटांत कसदार भूमिका करणारी अभिनेत्री नम्रता गायकवाड हिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. सिग्नेचर हॉलिडेज्च्या (वीणा वर्ल्ड) सुनीला पाटील यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
‘वीणा वर्ल्ड’च्या कार्यालयात झालेल्या या सोहळय़ात महिंद्रा टेस्ट ड्राइव्हच्या भाग्यवान विजेत्यांनाही गौरवण्यात आले. याशिवाय अन्य विजेत्यांना वामन हरी पेठे सन्स कडून सोन्याची राजमुद्रा, अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे बिस्किट, कलानिधीकडून पैठणी, मॅक इलेक्ट्रॉनिक्सकडून मोबाईल संच, आणि रेमण्ड, टायटन आणि पॅरेगॉन रिटेल शॉप यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके देण्यात आली. त्यातच नम्रता गायकवाड आणि सुनीला पाटील या आपापल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विजेत्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या दोघींनीही उपस्थितांशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांनाही मनमोकळेपणाने उत्तरे दिली.

विजेत्यांचा आनंद पाहून भारावले..
लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलच्या निमित्ताने ठाण्यातील ग्राहकांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाली. या विजेत्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मन भारावून गेले. असा उपक्रम राबवल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे आभार.    
नम्रता गायकवाड, अभिनेत्री

शेवटचे चार दिवस..
’लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या दुकानांमध्ये २५० रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या खरेदी करून या उपक्रमात सहभागी होता येईल.
’खरेदी झाल्यानंतर दुकानामधून मिळणारे कुपन पूर्ण भरून ड्रॉप बॉक्समध्ये टाकण्यात यावे. या ड्रॉप बॉक्समधून प्रत्येक दिवशी भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात  
’फेस्टिव्हलच्या अखेरीस भाग्यवान विजेत्यांना कार, विदेश यात्रा, एल.ई.डी., टीव्ही, फ्रिज, मोबाईल्स, सोन्याची नाणी अशी आकर्षक पारितोषिके दिली जातील. विजेत्यांची नावे ‘लोकसत्ता ठाणे’ मधून प्रसिद्ध केली जातील.
’ज्वेलरी शॉप्समध्ये तीन हजार व त्याहून अधिक खरेदी करणाऱ्यांस कूपन देण्यात येणार आहे तर रेमंड शॉप्समध्ये अडीच हजार व त्याहून अधिक  खरेदी करणाऱ्यांना कूपन्स उपलब्ध होतील.

४ फेब्रुवारीचे विजेते
सुश्मा झिंगरे, ठाणे
वर्षां राणे, डोंबिवली
तेजश्री फडणीस, कल्याण<br />संदीप ठाकूर, कल्याण
विकास सोमंत, डोंबिवली
चारूशिला लोखंडे, कल्याण
रचना कदम, विक्रोळी
संतोष म्हात्रे, ऐरोली
५ फेब्रुवारीचे विजेते
विशाल शहाणे, ठाणे
दिप संकपाळ, डोंबिवली
माधुरी घाडीगावकर, भांडूप
निरंजन रुद्रेश, कल्याण
सीमा चौधरी, कल्याण
अरूष गायकवाड, वाशिंद
प्रतिभा राईकवार, ठाणे
रमेश धुरी, ठाणे
६ फेब्रुवारीचे विजेते
वृशाली कुलकर्णी, अंबरनाथ
दिलीप चौधरी, डोंबिवली
मंदार कुलकर्णी, कल्याण
समिर पोतदार, ठाणे
सॅन्थीया एसेक्स, ठाणे
कविता बोलीन्जकर, ठाणे
यश शिंदे, टिटवाळ
श्रृती सावंत, सानपाडा
यश वाघुले, उल्हासनगर

७ फेब्रुवारीचे विजेते
यशवंत काटकर, डोंबिवली
विक्रांत शिंदे, डोंबिवली
अशिष गोखले, डोंबिवली
सुनिता शिंत्रे, ठाणे
रमेश गोपाळे, खर्डी
पुर्वा खरे, ठाणे
सीमा कुलकर्णी, ठाणे
कल्पेश ससे, अंबरनाथ
टेस्ट ड्राईव्ह विजेते
हेमंतकुमार पाटील, ठाणे
ऋषिकेश भोईर, उल्हासनगर
प्रगती पाटील, उल्हासनगर
रामकृष्ण मिडगोळे, ठाणे
अशिष मिश्रा, ठाणे
कृष्णा गुप्ता, ठाणे
हनुमंत मिडगोळे, ठाणे
राजेश नाईक, ठाणे
किरण शिंदे ठाणे
प्रसाद ठाकूर, ठाणे
किरण जाधव
चकोरी भालेराव, ठाणे
उमेश माळी, ठाणे
स्नेहा जाधव, ठाणे
प्रकाश फडणीस, ठाणे
प्रतिक सक्सेना, कल्याण

Story img Loader