गेल्या २३ जानेवारीपासून ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली या शहरांत सुरू असलेल्या ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. या शहरांतील १७० शोरूम्समधून खरेदी करून बक्षिसे जिंकण्याची ग्राहकांना रविवापर्यंत संधी आहे. ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान या फेस्टिव्हलमध्ये विजेते ठरलेल्या भाग्यवंतांना मंगळवारी ठाण्यातील बी-केबीन येथील ‘वीणा वर्ल्ड’च्या कार्यालयात गौरवण्यात आले. ‘वंशवेल’, ‘स्वराज्य’ या चित्रपटांत कसदार भूमिका करणारी अभिनेत्री नम्रता गायकवाड हिच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कृत करण्यात आले. सिग्नेचर हॉलिडेज्च्या (वीणा वर्ल्ड) सुनीला पाटील यादेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
‘वीणा वर्ल्ड’च्या कार्यालयात झालेल्या या सोहळय़ात महिंद्रा टेस्ट ड्राइव्हच्या भाग्यवान विजेत्यांनाही गौरवण्यात आले. याशिवाय अन्य विजेत्यांना वामन हरी पेठे सन्स कडून सोन्याची राजमुद्रा, अंकुर ज्वेलर्सकडून चांदीचे बिस्किट, कलानिधीकडून पैठणी, मॅक इलेक्ट्रॉनिक्सकडून मोबाईल संच, आणि रेमण्ड, टायटन आणि पॅरेगॉन रिटेल शॉप यांच्याकडून गिफ्ट व्हाऊचर अशी पारितोषिके देण्यात आली. त्यातच नम्रता गायकवाड आणि सुनीला पाटील या आपापल्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या महिलांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विजेत्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या दोघींनीही उपस्थितांशी संवाद साधताना त्यांच्या प्रश्नांनाही मनमोकळेपणाने उत्तरे दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा