ग्राहकांना खरेदीबरोबरच शेकडो आकर्षक पारितोषिके जिंकण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ यंदा २३ जानेवारी ते १५ फेब्रुवारीदरम्यान साजरा होणार आहे.
ग्राहकांना खरेदीबरोबरच दररोज बक्षिसे मिळविण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या खरेदी महोत्सवास गेल्या वर्षी पदार्पणातच खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे यंदा अधिक व्यापक स्वरूपात ही खरेदीजत्रा भरविण्यात येणार आहे. सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये स्टायलिंग पाटर्नर- द रेमंड शॉप, टेस्ट राइड पाटर्नर- महिंद्रा गुस्टो, ट्रॅव्हल पाटर्नर- वीणा वर्ल्ड, बँकिंग पार्टनर-जनकल्याण सहकारी बँक लि., प्लॅटिनम पार्टनर- वामन हरी पेठे अॅन्ड सन्स व तन्वी हर्बल, असोसिएट पाटर्नर- टीप-टॉप प्लाझा, जीन्स जंक्शन, लॉलीपॉप आणि स्टायलो, हॉस्पिटॅलिटी पार्टनर- द ठाणे क्लब, हेल्थ केअर पार्टनर- ज्युपिटर हॉस्पिटल, तर गिफ्ट पार्टनर म्हणून टायटन आणि विष्णूजी की रसोई सहभागी होत आहे. ठाण्यातील दुकानांबरोबरच नवी मुंबई, डोंबिवली आणि कल्याणमधील दुकानदारही या शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा