‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची रविवारी सांगता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : खरेदीचा आनंद घेतानाच त्यावर आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या ‘रिजन्सी ग्रुप’ प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ची येत्या १७ फेब्रुवारीला सांगता होणार आहे. शेवटच्या तीन दिवसांत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दैनंदिन बक्षिसांसोबतच महोत्सवाच्या शेवटी जाहीर केली जाणारी मोठी बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण व डोंबिवली या शहरांत सुरू असलेल्या या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी ग्राहकांना ‘शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी दुकानांतून खरेदी केल्यानंतर मिळणारे कूपन भरून ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. दररोज निवडल्या जाणाऱ्या विजेत्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर आणि रेफ्रिजरेटर यांसारख्या आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. महोत्सवाच्या शेवटी एकत्रितपणे कूपनची सोडत काढून विजेत्यांची निवड करण्यात येणार असून यात पहिले पारितोषिक कार व दुसरे पारितोषिक सहलीचे पॅकेज दिले जाणार आहे.

‘शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये नम्रता यांची उपस्थिती

ठाणे : प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता गायकवाड यांनी ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या विविध दुकानांना बुधवारी भेट दिली. त्यानिमित्ताने तिच्याशी संवाद साधण्याची संधी ठाणेकरांना मिळाली.

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महापालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ईशा टुर्स हे या शॉपिंग फेस्टिव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. टीजेएसबी हे बँकिंग पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट, रेमन्ड तलाव पाळी आणि टिप टॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, कृष्णा स्वीट आणि लीनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत, तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँडमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रह्मविद्या हे हीलिंग पार्टनर आहेत.

सहभागासाठी

’ लोकसत्ता ठाणे शॉपिंग महोत्सवात सहभागी दुकानात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या बक्षिसांची संधी मिळू शकेल.

’ सहभागी दुकानांमध्ये ३०० रुपयांपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बिल दिल्यानंतर दुकानदारांकडून त्यांना एक कूपन दिले जाईल.

’ ते कूपन भरून दुकानात असलेल्या ‘लोकसत्ता’च्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे.

’ अर्धवट माहिती भरलेली कूपन्स फेटाळली जातील.

’ ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये दररोज जमा होणाऱ्या कूपन्समधून दररोज भाग्यवान विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्याचे नाव ‘लोकसत्ता ठाणे’ आणि ‘लोकसत्ता महामुंबई’मधून प्रसिद्ध केले जाईल.

’ या स्पर्धेकरिता नियम आणि अटी लागू असतील.