उन्हाळ्याच्या सुट्टीत मुंबई-ठाण्यातील बरेच जण बाहेरगावी जातात. त्यातील बहुतांश आपल्या मूळ गावी म्हणजेच मुलखात जाणे पसंत करतात. साहजिकच रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा एप्रिल महिन्यात अक्षरश: ओसंडून वाहत असतात. रेल्वे प्रशासन उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त (ग्रीष्मकालीन) काही जादा गाडय़ा दरवर्षी सोडते. मात्र प्रवाशांची संख्या त्यापेक्षा किती तरी अधिक असते. त्यामुळे कसेबसे लोंबकळत प्रवास करीत प्रवाशांना गाव गाठावे लागते. सध्या कल्याण स्थानकात अशा प्रवाशांची एकच झुंबड उडालेली दिसते.
दीपक जोशी

Story img Loader