ठाणे : खारेगाव टोलनाका आणि साकेत पुलावर पडलेल्या खड्डय़ांमुळे शुक्रवारी मुंब्रा बाह्यवळण तसेच मुंबई-नाशिक महामार्गावर दिवसभर झालेल्या वाहतूक कोंडीत प्रवाशांचा जीव मेटाकुटीस आला. सततच्या वाहतूक कोंडीची दखल घेऊन ही समस्या धसास लावण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणांची तातडीची बैठक शुक्रवारी संध्याकाळी घेतली आणि वाहतूक कोंडीस खड्डे कारणीभूत ठरत असल्याने ते तातडीने बुजविण्याबरोबरच अन्य उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
loksatta satire article on uddhav thackeray chopper checking
उलटा चष्मा : तपासण्यांची उड्डाणे
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
Shrikant Shinde criticizes Uddhav Thackeray over bag checking
बँगा तपासल्या तर आगपाखड कशासाठी ? श्रीकांत शिंदे यांची उध्दव ठाकरे यांच्यावर टीका

हेही वाचा >> “जर मुलं सात वाजता शाळेत जाऊ शकतात, तर न्यायाधीश नऊ वाजता कामाला सुरुवात का करु शकत नाहीत?”

२० मिनिटांच्या अंतरासाठी दोन तास

मुंब्रा बाह्यवळण मार्गावर मुंब्रा रेतीबंदर पूल ते शिळफाटा येथील वाय जंक्शन पर्यंत तसेच मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका ते भिवंडीतील रांजनोली नाकापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अवघ्या १५ ते २० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी वाहन चालकांना सुमारे दीड ते दोन तास लागत होते. जवळपास रोजच होणाऱ्या या कोंडीमुळे प्रवासी आणि वाहनचालकांना मन:स्ताप होत आहे. त्याचबरोबर या कोंडीच्या प्रश्नावरून संबंधित शासकीय यंत्रणेच्या विरोधातही असंतोष व्यक्त आहे.

खड्डय़ांमुळे वाहनांची मंदगती  

ठाणे जिल्ह्यातून मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि मुंबई -नाशिक महामार्ग जातो. हलक्या वाहनांसह उरण जेएनपीटीहून गुजरात, ठाणे, मुंबईच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूकही याच मार्गावरून होते. पावसामुळे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना मंदगतीने वाहने चालवावी लागत आहेत. त्याचा परिणाम सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या आणि संध्याकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

ठाणे शहरात शुक्रवारीही मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पहाटेपासूनच मुंब्रा बाह्यवळण मार्ग ठप्प झाला होता. पहाटे जेएनपीटीहीहून आलेली अवजड वाहने सकाळी ११ नंतरही मुंब्रा बाह्यवळण मार्गावर कोंडीत अडकली होती. त्यामुळे या मार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, महापे, नवी मुंबई येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना कोंडीत अडकावे लागले. काही वाहन चालकांनी ऐरोली-महापेमार्गे प्रवास करून ठाणे गाठले. तर, मुंबई-नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका ते भिवंडीतील रांजनोली नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. ती सोडविताना पोलिसांच्याही नाकी नऊ आले. कोंडीमुळे कामासाठी बाहेर पडलेले काही कर्मचारी पुन्हा घरी परतले.

रात्री ८ नंतरही वाहनांच्या रांगा

मुंब्रा बाह्यवळण मार्ग आणि भिवंडीहून ठाण्याच्या दिशेने वाहूतक करणारी वाहने खारेगाव टोलनाका येथे एकाच ठिकाणी येऊन पुढे ठाणे, मुंबई, घोडबंदर किंवा नवी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मार्गावरील वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रात्री ८ नंतरही येथील वाहतूक कोंडी कायम होती.

खड्डे बुजविण्याचे निर्देश

’वाहतूक कोंडीचा आढावा घेऊन ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

’जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी बैठक घेतली. या बैठकीस पोलीस अधिकारी, सर्व महापालिका, राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अभियंते उपस्थित होते.

’खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याने मुख्य मार्गावरील खड्डे तातडीने बुजविणे आणि इतर उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.