नवी मुंबई – येथील कोपरखैरणे परिसरात भरवण्यात आलेल्या ग्रंथोत्सवातील पुस्तक विक्रीच्या दालनातून दोन दिवसात केवळ १०० ते १५० पुस्तकांची खरेदी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील विविध प्रकाशकांची १० दालने या ग्रंथोत्सवात होती. पहिल्या दिवशी वाचक आणि साहित्यप्रेमींच्या अनुपस्थितीमुळे पुस्तकांची खरेदरी कमी झाली होती. दुसऱ्या दिवशी पुस्तकांची खरेदी सर्वाधिक होईन अशी शक्यता प्रकाशकांना होती. परंतू, दुसऱ्या दिवशीही पुस्तक खरेदीला अल्प प्रतिसाद मिळाला असल्याची भावना काही प्रकाशकांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि ज्ञान विकास संस्था, कोपरखैरणे यांच्या संयुक्त विद्यमाने “ठाणे ग्रंथोत्सव २०२४” या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवात ग्रंथप्रदर्शन आणि साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाला जिल्ह्यातील केवळ दहा प्रकाशकांची पुस्तकांची दालने होती. कविता संग्रह, कथासंग्रह, आत्मकथा, कादंबरी, बालसाहित्य, शब्द संग्रह, स्पर्धा परिक्षा संदर्भातील पुस्तके, कायदे विषयक पुस्तके, राजकीय तसेच शेअर बाजार संबंधित असे विविध पुस्तके या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी अवघ्या काही साहित्यप्रेमींनीच या ग्रंथोत्सवाला भेट दिली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी कमी प्रमाणात पुस्तकांची खरेदी झाली. दुसऱ्या दिवशी या खरेदी वाढ होईल अशी अपेक्षा प्रकाशकांनी केली होती. परंतू, दुसरा दिवशी देखील पुस्तकांची कमी खरेदी झाल्याची खंत काही प्रकाशकांनी व्यक्त केली. प्रत्येक पुस्तक दालनात दोन दिवसात केवळ १० ते १५ पुस्तकांची खरेदी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

CIDCO HOMES APPLICATION LAST DATE (1)
Cidco House Lottery: घरं २६ हजार, अर्ज २२ हजार; कुणाला कुठे घर मिळणार? ‘या’ तारखेला अंतिम यादी येणार!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Liquidity in the banking system fell to a 15 year low print eco news
बँकिंग व्यवस्थेतील तरलता १५ वर्षांच्या तळाला; उपायादाखल रिझर्व्ह बँकेकडून ६०,००० कोटींची लवकरच रोखे खरेदी
Article of Tushar Kulkarni who worked tirelessly to save giraffe with help of Assam Zoo
उंच तिचं अस्तित्व…
teachers oppose copy free campaign
विश्लेषण : कॉपीमुक्त अभियानातील नव्या निर्णयाला शिक्षकांचा विरोध का?
bombay hc allows sheth developers to complete building no 8 in vasant lawns project in thane
पाचपाखाडीस्थित वसंत ल़ॉन्सच्या १२६हून अधिक सदनिका खरेदीदारांना दिलासा

हेही वाचा >>>३१ डिसेंबरच्या रात्री ३११ मद्यपी चालकांविरोधात कारवाई

विद्यार्थ्यांना ‘एक’ पुस्तक खरेदी करण्याचे आवाहन

ठाणे जिल्हा ग्रंथोत्सव २०२४ कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्थेच्या शाळेत भरविण्यात आले होते. त्यामुळे या ग्रंथोत्सवाला या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी संस्थेच्या अध्यक्षांनी ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक खरेदी करण्याचे आवाहन केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याने एक तरी पुस्तक खरेदी करावे असे त्यांच्या कडून सांगण्यात आले होते. त्यानुसार, काही विद्यार्थ्यांनी शैक्षणिक विषयावर आधारित, शब्ध संग्रह आणि काही कविता संग्रहाची पुस्तके खरेदी केली.

हेही वाचा >>>डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात फेरीवाल्यांसाठी १५० मीटरची सीमारेषा

या पुस्तकांचा समावेश

बटाट्याची चाळ, दोस्त, मुंबई ही महाराष्ट्राचीच, छत्रपती संभाजी, डोंगरयात्रा, लोक माझे सांगाती, श्यामची आई, कर्मवीर भाऊराव पाटील, फकिरा, अग्निपंख, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, झपुर्झा, इन्फोटेक असे विविध लेखकांची तसेच शेअर बाजार संबंधितील पुस्तकांचा या प्रदर्शनात समावेश होता.

जिल्ह्याचा ग्रंथोत्सवाला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतू, याठिकाणी पहिल्याच दिवसापासून फार कमी साहित्यप्रेमींची उपस्थिती लाभली होती. त्यामुळे पुस्तक खरेदीलाही अल्प प्रतिसाद मिळाल्याची खंत एका प्रकाशकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली.

Story img Loader