डोंबिवली – नेहमीच गर्दीने फुलून गेलेल्या डोंबिवली पूर्वेतील फडके रस्त्यावरील अंबिका हाॅटेलजवळील पदपथावर एक भजी विक्रेता दररोज संध्याकाळी पदपथाच्या बाजुला हातगाडी लावून त्याखाली सिलिंडर ठेऊन भजी विक्रीचा व्यवसाय करत आहे. उघड्यावर सिलिंडरचा वापर करणे प्रतिबंधित असताना पालिका, पोलीस अधिकाऱ्यांना न घाबरता हा विक्रेता बेधडक हा व्यवसाय करत आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेचे कर्मचारी विधानसभा निवडणूक कामात व्यस्त आहेत. पोलिसांच्या फडके रस्त्यावर फेऱ्या असल्या तरी त्यांच्या नजरेत सिलिंडर लावून भजी विक्री करणारा हातगाडी चालक नजरेत येत नसल्याबद्दल या रस्त्यावरील व्यापारी, विक्रेते, नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. यापूर्वी पोलिसांनी अशाप्रकारे रस्त्यावर सिलिंडरचा वापर करून विक्री व्यवसाय केल्या बद्दल संबंधित हातगाडी चालकांवर कायदेशीर कारवाई केली आहे. अलीकडेच टिळकनगर पोलिसांनी ९० फुटी रस्त्यावरील एका विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याचे हातगाडीसह सिलिंडर जप्त केले आहे.
हेही वाचा >>> कल्याण ग्रामीण शिंदे शिवसेनेचे प्रकाश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी
सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत डोंबिवली पूर्वेतील फडके रस्ता व्यापारी, विक्रेते, खरेदीदार यांनी गजबजून गेलेला असतो. डोंबिवली रेल्वे स्थानकालगत हा रस्ता येतो. या रस्त्यावरून रिक्षा, खासगी वाहनांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत हातगाडी जवळील सिलिंडरचा चुकून स्फोट झाला तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता व्यापारी व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यापासून या हातगाडीच्या बाजुला फटाके विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहेत. फडके रस्त्यावरील अनेक व्यापाऱ्यांनी आम्ही संबंधित विक्रेत्याला सिलिंडर लावून रस्त्यावर विक्री व्यवसाय करू नकोस असे सांगितले. तो ऐकण्यास तयार नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा >>> ठाणे जिल्ह्यातही नामसाधर्म्याची खेळी; चार मतदारसंघात मुख्य उमेदवारांच्या नावांशी साम्य असलेले उमेदवार रिंगणात
दररोज संध्याकाळी साडे पाच ते रात्री उशिरापर्यंत हा भजी विक्रीचा व्यवसाय सुरू असतो. गरम भजी खाण्यास मिळत असल्याने खाद्यप्रेमी या हातगाडीवर गर्दी करतात. या हातगाडीच्या बाजुला भाजी, फळ विक्रेते बसलेले असतात. त्यामुळे गर्दीने हा परिसर भरून गेलेला असतो. त्या्ंच्यामध्येच हातगाडी विक्रेता व्यापारी वापराचा सिलिंडर लावून भजी विक्री व्यवसाय करत आहे. कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकारी, रामनगर पोलिसांनी या विक्रेत्यावर कारवाई करण्याची मागणी फडके रस्त्यावरील विक्रेते, जागरूक नागरिकांनी केली आहे.