ठाणे – राज्यातील जळगाव, धुळे, वाशीम या शहरांसह इतर ठिकाणी लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून विविध उपायोजना राबविण्यात येत आहे. असे असतानाच ठाणे जिल्ह्यात सध्या लंपी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झालेला नसल्याचे ठाणे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींना कीटकनाशके फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही महिन्यांपूर्वी संपूर्ण राज्यभरात मोठया प्रमाणात गोवंशांतील जनावरांना लंपी आजाराने ग्रासले असल्याचे दिसून आले होते. यामध्ये मोठया संख्येने जनावरांचा मृत्यू झाला होता. मात्र पावसाळा सुरु झाल्यानंतर या आजाराची तीव्रता काहीशी कमी झाली होती. असे सकारात्मक चित्र दिसून येत असतानाच आता राज्यातील जळगाव, धुळे, वाशीम या शहरांसह इतर शहरांमध्ये लंपी आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. यावर तातडीने उपायोजना राबविण्याच्या सूचना राज्य पशुसंवर्धन विभागाकडून स्थानिक जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात सध्या लंपी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झालेला नसल्याचे ठाणे पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून लम्पी चर्मरोग नियंत्रणासाठी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागासह इतर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींना कीटकनाशके फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यात एकही पशू रुग्ण आढळून आलेला नाही. गोवंशीय जनावरांना लसीकरणासाठी जवळच्या सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा. तसेच इतर जिल्ह्यातून जनावरे खरेदी करत असताना लसीकरण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पशुधन पालक शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण ६९ पशुवैद्यकीय संस्था आहेत त्यांच्यामार्फतच लसीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे ६९ पशुवैद्यकीय संस्थांमार्फत लसीकरण चालू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९०% लसीकरण झाले आहे. एकूण ७९ हजार ५०० लस मात्रा उपलब्ध झाल्या होत्या. त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायतींना गावात व गोठ्यामध्ये जनावरांच्या अंगावर गोचीड गोमाशा नाश करण्यासाठी फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लंपी रोगाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात होणार नाही, यासाठी पुरेपूर दक्षता घेण्याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी निर्देश दिले आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवलीत पेंढरकर महाविद्यालयासमोरील सततच्या कोंडीने प्रवासी हैराण

हेही वाचा >>>प्राणीमित्र संघटना बांधणीसाठी महापालिकेचा पुढाकार; ठाणे शहरातील भटक्या प्राण्यांचा उपद्रव कमी करण्याचा उद्देश

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.व.दि.जोशी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.समीर तोडणकर यांनी या रोगाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाचा व जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग पूर्णपणे सज्ज असून मदतीसाठी पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००-२३३०-४१८ अथवा राज्यातील कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्रमांक १९६२ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन केले. लम्पी चर्मरोग हा केवळ गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा कीटकांपासून पसरतो. हा आजार जनावरांपासून मानवांना संक्रमित होत नाही, अशीही माहिती उपायुक्त डॉ.व.दि.जोशी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.समीर तोडणकर यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lumpy skin disease is not prevalent in thane district at present amy
Show comments