ठाणे – ठाणेकरांना समाजातील वास्तुविशारदांच्या भूमिकेबद्दल जागरूक करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना स्थापत्य क्षेत्रातील अभ्यासक्रमांबद्दल मार्गदर्शन मिळावे याकरिता भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या ठाणे केंद्रामार्फत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात महाकॉन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारतीय वास्तुविशारद संस्थेच्या ठाणे केंद्रामार्फत (महाराष्ट्र चॅप्टर) आयोजित ‘महाकॉन २०२५’ आणि पश्चिम प्रादेशिक परिषद यंदाच्या वर्षी ‘ॲडॅप्टिव्ह रीयूज आणि पॅरामेट्रिक आर्किटेक्चर चा संगम (कॉन्फ्युअन्स)’या विषयावर पार पडत आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध वास्तुविशारदांचे सादरीकरण आणि चर्चासत्र रंगले. यामध्ये लंडन चे वास्तुविशारद झाहा हदीद, वास्तुविशारद जोहान्स शॅफेलनर, स्टुडिओ इमर्जन्सच्या वास्तुविशारद खुशबू दावडा, प्ले आर्किटेक्चरचे वास्तुविशारद सेंथिल कुमार दॉस, स्टुडिओ आर्डेटचे वास्तुविशारद बद्रीनाथ कालेरू आणि बीएनसीए च्या प्रमुख वास्तुविशारद धनश्री सरदेशपांडे अशा विविध वास्तुविशारदांचा समावेश होता. तसेच आयआयए ठाणे केंद्राने आयईएस स्थापत्य महाविद्यालयाच्या सहकार्याने ‘द पी- पॉड’ या डिझाइन आणि बिल्ड स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यातील अंतिम फेरीत पोहोचलेल्या स्पर्धकांच्या चना या परिषदेच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.
देऊळ कथन प्रदर्शनाला सर्वाधिक पसंती
डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ असलेल्या मैदानात वास्तुविशारद क्षेत्राशी निगडित विविध स्टॉल्स प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. याबरोबरच आयईएस स्थापत्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोकण आणि गोव्यातील प्राचीन मंदिरांच्या दस्तऐवजीकरणावर तयार केलेले ‘देऊळ कथन’ हे प्रदर्शन नागरिकांसाठी मुख्य आकर्षण ठरत आहे.
वास्तुविशारदांच्या हाताला ताकद देण्याची जबाबदारी आमची – जितेंद्र आव्हाड
वास्तूविशारदांनी काही गोष्टी ठळकपणे मांडणे गरजेचे आहे. तेव्हाच त्या गोष्टी नागरिकांना समजतील. वास्तुविशारदांनी विकासकांचा विचार करण्याऐवजी नागरिकांचा विचार केला पाहिजे. भारताच्या भव्य निर्मीतीमध्ये वास्तुविशारदांचा जितका हात आहे. तेवढा हात मला वाटतं नाही इतर कोणाचा आहे. तेव्हा या हाताला ताकद देण्याची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आहे, असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्घाटन प्रसंगी मांडले. वास्तुविशारदांचा हात मजबूत झाला तर, हा देश सुंदर होईल. सुंदरता संकल्पना म्हणजे श्रीमंती नव्हे तर, गरिबांसाठी देखील शहर तेवढचं सुंदर असले पाहिजे. शहर हे कोणत्याही श्रीमंतामुळे बनत नसते तर, शहर गरिबांमुळे पुढे जात असते. त्या गरिबांसाठी तुमच्याकडून सर्वाधिक योजना आल्या पाहिजे. जेणेकरुन त्यांच जीवन सुखकर होईल, असेही ते म्हाणाले.
एसटी बसस्थानकांच्या निर्मीतीत वास्तुविशारदांचे योगदान महत्त्वाचे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भविष्यामध्ये एसटीची बसस्थानके बांधताना ते सुंदर आणि सुशोभित असावीत यासाठी महाराष्ट्रातील वास्तुविशारदांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यांनी एसटीच्या मोकळ्या जागेवर विकसित होत असलेल्या प्रकल्पामध्ये आपल्या सुंदर आणि कल्पक कौशल्यातुन पर्यावरण पूरक आणि शाश्वत विकासाचे रोल मॉडेल तयार करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.