कल्याण – विश्वातून श्रध्दा, भावनेने कोट्यवधी भाविक प्रयागराज येथे महाकुंभासाठी दाखल झाले आहेत. जातीभेदाच्या भिंती महाकुंभच्या माध्यमातून मोडून पडल्या आहेत. त्यामुळे महाकुंभ हे हिंदुत्वाचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील देवधर यांनी रविवारी येथे केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे प्रा. रामभाऊ कापसे स्मृती व्याख्यानमाला सुभेदारवाडा शाळेत आयोजित करण्यात आली होती. ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि विकसित भारत’ विषयावर ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, डाॅ. आनंद कापसे, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, मंडल अध्यक्ष वरूण पाटील, भाजप महिला आघाडीच्या रेखा चौधरी उपस्थित होते.

जनसंघ आणि त्यानंतर देश, राष्ट्रप्रथम या भावनेतून देश कार्यासाठी जी माणसे झिजली. राष्ट्राच्या अखंड सेवेत राहिली त्यामध्ये प्रा. राम कापसे यांचे नाव अग्रभागी आहे. प्रत्येकामध्ये हा राष्ट्रभाव निर्माण झाला पाहिजे ही दिवंगत प्रा. राम कापसे यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रवक्ते देवधर यांनी सांगितले.

काँग्रेसच्या राजवटीत पक्ष स्वार्थाव्यतिरिक्त सामान्यांचा विचार कधीच केला गेला नाही. ते काम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले आहे. सामान्य नागरिकांच्या विकासासाठी, शेतकरी, विविध जाती समुहांसाठी विविध योजना आणून त्यांचा उत्कर्ष साधला जात आहे. या देशातील सामान्यांचा उत्कर्ष हे विकसित भारताचे खरे लक्षण आहे. तळागाळात सामान्यांच्या हिताच्या योजना झटपट पोहचतील, त्यांची अंमलबजावणी होईल यादृष्टीने पंतप्रधान स्वता प्रयत्नशील आहेत, असे देवधर यांनी सांगितले.

प्रयागराज येथे ४७ कोटी लोक एकावेळी एकत्र येतील अशी व्यवस्था उभारण्यात आली आहे. जातीभेदाच्या भिंती या महाकुंभने तोडल्या आहेत. हेच हिंदुत्वाचे खरे प्रतिक आहे, असे देवधर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांचा कारभार सुरू झाल्यापासून देशातील स्फोटांच्या मालिका थांबल्या आहेत. गैरव्यवहारांना आळे बसले आहेत. सरकारकडून सुरक्षितेसाठी वेगळ्या व्यवस्था उभारल्या जात आहेत. त्याचबरोबर आता नव्वद टक्के कामे करण्याची सामान्यांचीही जबाबदारीही वाढली आहे. या व्यवस्था सांभाळत पुढे जात आपल्याला विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे आहे, असे देवधर यांनी सांगितले.

कल्याणमध्ये जनता दरबार जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य लोकांचे प्रश्न शासन दरबारी पोहचतात. त्या प्रश्नांची सोडवणूक होते. येत्या काळात आपण कल्याण, डोंबिवलीत जनता दरबार घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे वनमंत्री गणेश नाईक यांंनी सुभेदारवाडा कट्टा स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन करताना सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विविध भागात जाऊन जनता दरबार घ्यावेत ज्यामुळे लोकांच्या नागरी समस्या मार्गी लागतील, असे वनमंत्री नाईक म्हणाले.