महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने महिलांसाठी चमत्कार प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवार १३ फेब्रुवारी रोजी डोंबिवली पश्चिम येथील जोंधळे शाळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीत हे शिबिर होणार आहे.

प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. दुशंत भादलीकर हे मन व मनाचे आजार या विषयावर या शिबिरात मार्गदर्शन करणार आहे. त्याच बरोबर वैज्ञानिक दृष्टीकोन, महिला व अंधश्रद्धा, फल ज्योतिष्य या विषयांवर श्रीप्रसाद खुळे, श्री अशोक वानखडे, श्री जगदीश सदाशिव हे मार्गदर्शन करणार आहेत. तर चमत्कारांचे प्रात्यक्षिके सादर करून ते प्रशिक्षणार्थींना शिकविण्याचे महत्वाचे काम वंदनाताई शिंदे आणि राजेंद्र कोळी हे करणार आहे.

BMC cbse and icse school 10th class exams news in marathi
पालिकेच्या सीबीएसई आणि आयसीएसई शाळेचे विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार, पालिकेच्या शिक्षण विभागाची कसोटी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
College students die in ordnance factory explosion in bhandara
आयुध निर्माणीतील स्फोटात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, प्रशिक्षणार्थी कामगार..
Tuberculosis Eradication Center , Mira Bhayandar Municipal School, Tuberculosis , Students health, loksatta news,
मिरा भाईंदर महापालिकेच्या शाळेत क्षयरोग निर्मूलन केंद्र, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात
‘तोपची’मधून तोफा, गनर्सचे कौशल्य अधोरेखीत-प्रदर्शनात प्रगत शस्त्रसामग्री सादर
sanitary napkin vending machines
‘सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन’वर संकोच अन् अनास्थेची धूळ
ayurvedic experts to hold seminar on garbhavigyan event at iit bombay
आयआयटी प्रांगणात ‘गर्भविज्ञान’ धडे; उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून विरोध
makar sankranti history significance of makar sankranti festival
काळाचे गणित : सरकती संक्रांत

बुवा, बापू, महाराज यांच्या माध्यमातून सर्वात जास्त शोषण हे महिलांचे होत असते. त्यांनी केलेल्या थातूरमातूर चमत्काराला भूलून महिला शोषणाला बळी पडतात. त्यांच्या कथित चमत्कारांच्या मागे कशी हातचलाखी असते किंवा विज्ञानाच्या प्रयोगांनाच चमत्काराच्या नावावर कसे खपवलं जातं,  याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण महिलांना यावेळी देण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणार्थी महिलांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याला जोडून घ्यावे व समाजामध्ये जाऊन इतर महिलांना जागृत करावे हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा प्रवीण देशमुख यांनी स्पष्ट केले.

हे शिबिर विनामूल्य असून ज्या महिला हे प्रशिक्षण घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जोडून घेऊ इच्छितात व समाज प्रबोधनाचे काम करू इच्छितात त्या महिलांना हे चमत्काराचे सर्व साहित्य विनामूल्य देण्यात येणार आहे.

ज्या महिलांना यामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अशोक वानखडे (९४२०४६७५४३), राजू कोळी (९१६७३७७४३१), वंदना शिंदे  (९८६९१५१६७९)  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारणी सदस्य प्रा. प्रवीण देशमुख यानी केले आहे.

Story img Loader