ठाणे/ कल्याण/ दिवा : मशिदीवरील भोंगे काढले पाहिजे, यात दुमत नाही, असे सांगत आमची सत्ता आली तर ४८ तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वठणीवर आणू, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना केले. मतांचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले.

मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा- माजीवडा उमेदवार संदीप पाचंगे, कळवा- मुंब्र्यातील उमेदवार सुशांत सूर्यराव, कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी तीन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊन नेऊ, असे कुरणमध्ये लिहिले आहे. मग, लाऊडस्पीकरचा कुराणमध्ये उल्लेख आहे का, अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसऱ्यांना त्रास देणे असा कुठला धर्म आहे, अशी विचारणा करत लाऊडस्पीकर लावण्यापेक्षा अलार्म लावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
उद्धव ठाकरेंची स्वबळाची भूमिका टोकाची नाही : शरद पवार
Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे सध्या तडफडत आहेत कारण… किरीट सोमय्यांनी थेट…
Uddhav Thackeray vs Eknath Shinde over Shiv Sena chief Balasaheb Thackerays memorial
ठाकरे विरुद्ध शिंदे पुन्हा लढाई! ठाकरेंना सूड उगवायचा आहे
Thane , Eknath Shinde , Uddhav Thackeray group,
आरोप, शिव्याशाप देत राहिले तर वीसच्या पुढचा शुन्यही निघून जाईल, एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

हेही वाचा >>> कपिल पाटील यांची तलवार म्यान ? लागोपाठ दोन समर्थक बंडखोरांची माघार, महायुतीच्या प्रचारात सक्रीय

गेले अनेक वर्षे त्याच, त्याच विषयांवर निवडणुका लढल्या जात आहेत. गेले ५० वर्षे शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत गरजा आजही संपलेल्या नसून याच विषयांवर आजही निवडणुका लढविल्या जात आहेत, त्यामुळे येथील तरुणांना नवीन सुचणार कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. विकास, नागरी समस्यांच्या विषयावर कोणीही आमदार, खासदारांना प्रश्न विचारत नाही. निवडणुका आल्या की आपणही त्यांचे गुलाम असल्यासारखे मतदान करतो. निवडणुका म्हणजे आता खेळ होऊन बसलाय, असेही ते म्हणाले. पाच वर्षात एकदा मनसेला नाशिकची सत्ता मिळाली. त्यावेळी पाच वर्षाच्या आत सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलविणारी आश्वासने देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार आणि कशी करणार ते सांगितले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय तमाशा आपण पाहिला आहे. या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातून महाराष्ट्राला आपणास बाहेर काढायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री पदाचा मोह

मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे. मला कुठल्याही खुर्चीचा मोह नाही. मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यात पडावी असाही मोह नाही, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

उद्धव ठाकरे म्हणतात की मी प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांची मंदिर बांधणार आहे. पण आपल्याला मंदिर नको तर विद्यामंदिर आणि गड किल्ले बनवायचे आहेत. कारण विद्या मंदिरांची कमतरता आहे आणि गड किल्ले हे पुढच्या पिढीने दाखवायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Story img Loader