उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाविकासआघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हा बंद यशस्वी करण्यासाठी रस्त्यावर देखील उतरल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकानं बंद ठेवली आहेत. दरम्यान, ठाणे शहरात बंद दरम्यान रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांना शिवसैनिकांकडून रस्त्यावरच मारहाण करण्यात आल्याचाही प्रकार समोर आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यामुळे ठाण्यामध्ये बंद पाळण्यासाठी शिवसैनिकांची एकप्रकारे दादागिरी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे रिक्षाचालकांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांमध्ये उपमहापौरांचे पती पवन कदम यांचा देखील सहभाग दिसून आला. महाराष्ट्र बंद दरम्यान रिक्षा देखील बंद ठेवल्या जाव्यात, यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतर रिक्षाचालकांना दमदाटी करत, मारहाण केल्याचे दिसून आले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.

महाराष्ट्र बंद असल्याने टीएमटी बससेवा बंद आहे, परिणामी नागरिकांना इच्छित स्थळी पोहचण्यासाठी रिक्षाचा वापर करावा लागत आहे. परंतु, शिवसैनिकांच्या या मारहाणीमुळे रिक्षाचालकांमध्येही दहशतीचे वातावरण पाहायाल मिळत आहे.

ठाण्यामधील जांभळीनाका परिसरात हा प्रकार घडला आहे. या ठिकाणी अनेक शिवसैनिक काठीने रस्त्यावर चालणाऱ्या रिक्षांमधील रिक्षाचालकांना मारहाण करत होते व रिक्षा बंद करा असं सांगत होते. याशिवाय एक रॅली देखील काढली गेली होती, त्याद्वारे जी दुकानं उघडी होती ती बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याचेही समोर आले आहे. अनेक दुकानांमध्ये शिवसैनिक घुसले होते व दुकानं बंद करण्यास भाग पाडलेलं आहे. एकुणच ठाण्यामध्ये एक दहशतीचे वातावरण निर्माण करून हा बंद पाळण्यास भाग पाडल्या जात असल्याचं समोर येत आहे. शिवसैनिकांच्या या कृतीचं अनेक नागरिकांमधून निषेध नोंदवला जात आहे.