गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने चर्चेत आहे. एकनाथ शिंदे हे कायमच विविध कार्यक्रमात हजेरी लावताना दिसतात. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी एका क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी एकनाथ शिंदेंनी मैदानावर तुफान फटकेबाजी केली. त्यांचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने ठाण्यात ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक २०२३’ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (१५ जानेवारी) हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी काही कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंना क्रिकेट खेळण्याची विनंती केली. कार्यकर्त्यांनी केलेल्या विनंतीला मान देत एकनाथ शिंदेंनी क्रिकेटच्या मैदानात जोरदार बॅटिंग केली.
आणखी वाचा : डाव्होसमध्ये ७६ तासांत मुख्यमंत्री फक्त ४ तास झोपले? दीपक केसरकरांच्या दाव्याची चर्चा; म्हणाले…

नुकतंच एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे हे मैदानात बॅटिंग करताना दिसत आहे. यावेळी त्यांनी तीन चेंडूवर चांगली फटकेबाजी केली. त्यांच्या या जोरदार फटकेबाजीमुळे प्रत्येक बॉल सीमापार केल्याचे पाहायला मिळाले. त्यांची ही तुफान फटकेबाजी पाहून सर्वजण बघतच राहिले.

आणखी वाचा : Maharashtra Cabinet Expansion : “अमित शाहांबरोबर…”, देवेंद्र फडणवीसांचं मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूचक वक्तव्य!

एकनाथ शिंदे यांचा मैदानावरील उत्साह पाहून खेळाडू यांच्यासह चाहत्यांचाही उत्साह वाढल्याचे दिसून आले आहे. त्यांची ही तुफान फटकेबाजी पाहून खेळाडूंनीही टाळ्या वाजवत शिंदेंचा उत्साह वाढवला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.