महाराष्ट्रात आणि मुंबई परिसरात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने निरनिराळ्या राज्यांमधून अनेक जण येऊन स्थायिक होतात. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन वर्षांनुवर्षे स्थायिक झालेल्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कल्याण आणि परिसरात कर्नाटकातून आलेल्या मंडळींनी नागरिकांनी एकत्र यावे म्हणून कर्नाटक संघ कल्याण संस्थेची स्थापना १४ वर्षांपूवी केली. या संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. कोणत्याही जातिधर्मातल्या गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक मदत दिली जाते. हे सर्व करीत असताना या संघातर्फे दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. कर्नाटक ही मूळ भूमी असली तरी महाराष्ट्र ही कर्मभूमी असल्याची जाणीव ठेवून या संस्थेमार्फत महाराष्ट्र दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमात महाराष्ट्र गीताबरोबरच इतर मराठी गीते सादर केली जातात. शहरातल्या दोन मान्यवर मराठी व्यक्तींचा दरवर्षी सत्कारही केला जातो.
सुरेश पटवर्धन, कल्याण

कचराकुंडय़ा हटल्या, पण कचरा तसाच
शहरातील काही ठिकाणच्या कचराकुंडय़ा पालिकेच्या वतीने हलविण्यात आल्या खऱ्या, पण तेथील कचरा काही हटलेला दिसत नाही. या कचराकुंडय़ा ओसंडून वाहताना रस्त्यावर कचरा पसरलेला असतो.डोंबिवली पूर्वेतील न्यू आयरे रोड परिसरातील मैदानाच्या बाहेर पूर्वी असलेली एक कचराकुंडी सध्या हटविण्यात आली आहे. परंतु नागरिक आजही येथे मोठय़ा प्रमाणात कचरा टाकतात. कामावर येताजाता महिला रिक्षातून कचरा फेकतात, घंटागाडी निघून गेल्यावर काही कचरावेचकही त्याच ठिकाणी सोसायटीमधून गोळा केलेला कचऱ्याचा डबा रिकामा करतात. दुकानदार आपल्या दुकानातील कचरा येथेच टाकतात. कधी कधी पालिकेची गाडी येतही नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दरुगधी सुटते. शहर स्वच्छतेचा नारा लगाविणाऱ्यांनी प्रथम नागरिकांमध्ये जनजागृती करा, जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांना दंड ठोठवी
नलिनी पाटील, डोंबिवली

एमआयडीसी भागात टपऱ्यांचे अतिक्रमण
डोंबिवली एमआयडीसी, शिळफाटा रस्ता परिसरात मे महिना आला की टपऱ्या, मांडव टाकून जागा अडविणे, असे प्रकार सुरूहोतात. या टपऱ्या वेळीच हटविल्या नाहीत तर त्या जागेवर लगेच पक्की बेकायदा बांधकामे उभी करण्यात येतात आणि ही पक्की बांधकामे मग वाहतुकीला अडथळा ठरतात. कोणत्याही कोपऱ्याला वाहनाने वळण घ्यायचे असेल तर पहिले टपरीचा अंदाज घ्यावा लागतो. एमआयडीसी, पालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन या बेकायदा टपऱ्या तातडीने तोडून टाकाव्यात. या भूछत्रासारख्या उगविणाऱ्या टपऱ्या नंतर टोलेजंग इमारतीच्या रूपाने पुढे येतात. वर्षांनुवर्षे हेच होत गेले आणि शहराला बकालपण येत गेले.
पुरुषोत्तम आठलेकर, डोंबिवली

Story img Loader