महाराष्ट्रात आणि मुंबई परिसरात नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने निरनिराळ्या राज्यांमधून अनेक जण येऊन स्थायिक होतात. कर्नाटकातून महाराष्ट्रात येऊन वर्षांनुवर्षे स्थायिक झालेल्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. कल्याण आणि परिसरात कर्नाटकातून आलेल्या मंडळींनी नागरिकांनी एकत्र यावे म्हणून कर्नाटक संघ कल्याण संस्थेची स्थापना १४ वर्षांपूवी केली. या संघाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक उपक्रम आयोजित केले जातात. कोणत्याही जातिधर्मातल्या गरीब विद्यार्थ्यांना दरवर्षी शैक्षणिक मदत दिली जाते. हे सर्व करीत असताना या संघातर्फे दरवर्षी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. कर्नाटक ही मूळ भूमी असली तरी महाराष्ट्र ही कर्मभूमी असल्याची जाणीव ठेवून या संस्थेमार्फत महाराष्ट्र दिन मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमात महाराष्ट्र गीताबरोबरच इतर मराठी गीते सादर केली जातात. शहरातल्या दोन मान्यवर मराठी व्यक्तींचा दरवर्षी सत्कारही केला जातो.
सुरेश पटवर्धन, कल्याण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा