येत्या महाराष्ट्रदिनी खाद्यसंस्कृती रुजविणाऱ्या डोंबिवलीकरांचा आगळावेगळा सत्कार केला जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, १ मे रोजी संध्याकाळी ६ ते १० या वेळेत स. वा. जोशी हायस्कूलच्या पटांगणात गौरविले जाणार आहे. यावेळी डोंबिवलीची खाद्यसंस्कृती घडवणाऱ्या, रुजवणाऱ्या ती नावारूपाला आणणाऱ्या १५ नामवंत उद्योजकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे. पाककृती स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. यादवकालीन मराठीपासून आजच्या व्हॉट्स अ‍ॅपपर्यंतच्या मराठी बदलत्या स्वरूपाचा सांगीतिक आढावा घेणारा मराठीनामा हा कार्यक्रमही सादर होणार आहे. कौशल इनामदार, गिरीश कुलकर्णी, सुनील बर्वे, चिन्मयी सुमीत, सोनिया परचुरे, हृषिकेश रानडे, मधुरा कुंभार, भरत बलवल्ली, प्रल्हाद जाधव, सत्यजीत प्रभू, आर्चिज लेले असे कलावंत भाग घेणार आहेत.

Story img Loader