बदलापूरः डोंगरांना लागणारा वणवा रोखण्यासाठी मनुष्य यंत्रणा कमी पडत असताना नेरळच्या माथेरान डोंगरावर मनुष्यविरहीत वणवा प्रतिबंधक यंत्रणा विकसीत केली. सगुणा रूरल फाऊंडेशनच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या सगुणा वनसंवर्धन तंत्राला नुकतेच महाराष्ट्र वन विभागाच्या वनश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला. सामाजिक वनीकरणास हातभार लावणाऱ्या संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प महिनाअखेरीस होण्याची चिन्हे; अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात 

Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
christmas celebrated with prayers in sangli
सांगलीत प्रार्थना, शुभेच्छांनी नाताळ साजरा
devotees crowd in pandharpur due to christmas holidays
नाताळ सुटीमुळे पंढरपूरला भाविकांची गर्दी
Why Hindu gods dance
हिंदू देवता नृत्य करतात तर इतर धर्मातील देव नृत्य करत नाहीत असे का?। देवदत्त पट्टनायक यांच्याबरोबर कला आणि संस्कृती
Maharashtra Loksatta Lokankika Kolhapur division Why Not Ekankika won Mumbai news
कोल्हापूर विभागाची ‘व्हाय नॉट?’ महाराष्ट्राची लोकांकिका; रत्नागिरी विभागाच्या ‘मशाल’ला द्वितीय तर पुण्याच्या ‘सखा’ला तृतीय पारितोषिक

बुधवारी ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित समारंभात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते वनश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यात माथेरानच्या वन विभागाच्या जागेवर राबावण्यात आलेल्या मनुष्यविरहीत वणवा प्रतिबंधक प्रयोग करणाऱ्या सगुणा रूरल फाऊंडेशनला गौरवण्यात आले. याबाबतचे वृत्त सर्वप्रथम लोकसत्ता ठाणेमध्ये प्रकाशित करण्यात आले होते. माथेरानच्या डोंगरावर सगुणा रूरल फाऊंडेशनच्या माध्यमातून सगुणा वनसंवर्धन तंत्राचा वापर करत वणवा प्रतिबंध करण्यात आला.

हेही वाचा >>> ठाण्यात तरण तलावांची सदस्य नोंदणी यंदाही ऑनलाईनद्वारे; दोन वर्षांपासून पालकांची रांगेतून सुटका

डोंगरावर तननाशक फवारणी करत वणव्याच्या आगीला रोखण्याची मनुष्यविरहीत पद्धत विकसीत करण्यात आली होती. त्यामुळे माथेरानच्या डोंगरावर वन विभागाच्या जागेत वणव्यापासून संरक्षण झाले. हाच प्रयोग पुढे कल्याण कसारा रेल्वे मार्गावर आसनगाव भागात जेथे रेल्वे रूळाशेजारी वणवे पेटत होते तिथे राबवण्यात आला. यामुळे सामाजिक वनीकरणास फायदा झाला. त्यामुळे हे तंत्र विकसीत करण्यात सगुणा रूरल फाऊंडेशनच्या चंद्रशेखर भडसावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यावेळी छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. २०१९ या वर्षाचा हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आमदार किसन कथोरे, आमदार शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये आणि अधिकारी उपस्थित होते. सगुणा वणसंवर्धन तंत्र हे कमी खर्चातून प्रभावी वणवा प्रतिबंधक असून त्यातून वन्यजीव संरक्षण होऊन जमिनीची धूप थांबते अशी माहिती चंद्रशेखर भडसावळे यांनी दिली आहे.

Story img Loader