महाराष्ट्र राज्याची १९६० मध्ये स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यातील शहरांचा नियोजनबद्ध, जनतेला राहण्यासाठीच योग्य असा विकास व्हावा म्हणून निकष ठरवले. १९७९ साली ते प्रसिद्ध करून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना पाठविले. १९७९ साली केलेले निकष/ प्लॅनिंग स्टँडर्ड यात शासनाने अद्याप काहीही बदल केलेला नाही.
प्रत्येक नागरिकाला त्याचे जीवन योग्य पद्धतीने व्यतित करण्यासाठी तो जिथे राहतो, तेथे क्रीडांगण, बगिचा, शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, मनोरंजनासाठी व्यवस्था, चांगले रस्ते, फूटपाथ, चांगला पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि सुरक्षित व सोयीस्कर निवासी इमारती व चांगली वाहतुकीची साधने असावयास हवी. डोंबिवली शहराची सध्या लोकसंख्या (पूर्व+पश्चिम) साधारणपणे ६ लाख आहे. या शहरासाठी वरील सर्व सोयी-सुविधा खालीलप्रमाणे आवश्यक आहेत.
’क्रीडांगण : दर १ लाख लोकसंख्येला १०० एकर याप्रमाणे ६ लाख लोकसंख्येसाठी ६०० एकर जागा क्रीडांगणासाठी असावयास हवी. सध्या डोंबिवली जिमखाना धरून जेमतेम २५ एकर क्षेत्र खेळण्यासाठी आहे.
’उद्यान : १ हजार लोकसंख्येसाठी अर्धा एकर याप्रमाणे ३०० एकर क्षेत्र असावयास हवे. सध्या डोंबिवलीत उद्यानाचे क्षेत्र १० ते १५ एकर आहे.
’मनोरंजन : यासाठी ९० एकर क्षेत्र आवश्यक आहे. त्यात नाटय़गृह, सिनेमा, प्रदर्शनगृह या इमारती असाव्यात.
’शिक्षण संस्था : प्रत्येक विद्यार्थ्यांमागे १० चौ. मीटर क्षेत्र राखीव असावे. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व कॉलेज यामध्ये शिकणारे विद्यार्थी साधारणपणे दीड लाख तरी असावेत. म्हणजे १५ लाख चौ.मी. क्षेत्र यासाठी असावे. म्हणजेच ३७५ एकर जमीन यासाठी आवश्यक आहे.
’रुग्णालये : १० हजार लोकसंख्येसाठी २५०० चौ.मी. क्षेत्र याप्रमाणे १,५०,००० चौ.मी. म्हणजे ३७५ एकर जमीन क्षेत्र असावे.
’भाजी मंडई : दर १०००० लोकसंख्येसाठी २००० चौ.मी. क्षेत्र याप्रमाणे १,२०,००० चौ.मी. क्षेत्र असावयास हवे. सध्याच्या मंडई, मासळी मार्केट यांचे क्षेत्रफळ जेमतेम ५ एकर असेल.
’वाचनालय : दर १० हजार लोकसंख्येसाठी ५०० चौ.मी. याप्रमाणे साडेसात एकर क्षेत्र वाचनालयासाठी हवे. सध्या हे क्षेत्र अर्धा एकरच असावे.
’टाऊन हॉल : ५००० चौ.मी. क्षेत्र आवश्यक आहे. सध्या ते जेमतेम ५०० चौ. फूट आहे.
’रस्ते : सर्व रस्ते १५ मी. रुंदीचे असावेत व वाहनांची वर्दळ त्याचा सव्‍‌र्हे करून १८ मी., २० मी., ३० मी. याप्रमाणे रुंदी असावी. त्यात दोन्ही बाजूंना फूटपाथ (गटर कव्हिरग ४ मी. रुंदीचे असावेत.)
’वाहनतळ : रेल्वे स्टेशन, बस आगार, सिनेमागृह, भाजी मंडळ या ठिकाणी दर मोटारीमागे २५ चौ.मी. व टू व्हीलरसाठी ५ चौ.मी. क्षेत्र राखीव असावे.
’याशिवाय स्मशान, कंपोस्ट पीटस्, बहुउद्देशीय हॉल, सिनेमागृह, नाटय़गृह, सांस्कृतिक केंद्र, तरणतलाव, व्यायामशाळा, घनकचरा नष्ट करण्यासाठी वेगळे क्षेत्र आरक्षित असावे. जलवाहिन्या, ड्रेनेज पाइप, पावसाच्या पाण्याचे पाइप/ गटर, टेलिफोन केबल, विजेच्या केबल, गॅस पाइपलाइन यासाठी गरजेप्रमाणे डक्टस् रस्त्याच्या बाजूला (फूटपाथखाली नाही) असावेत.
’डोंबिवली शहरात नागरिकांना चांगल्या प्रकारे जीवन जगण्यासाठी वरीलपैकी सुविधा काही तुटपुंज्याच आहेत. तर काही सुविधा नाहीतच, अशी अवस्था आहे. यात सुधारणा कशी करावयाची व नागरिकांना राहण्यासाठी शहर चांगले कसे करायचे व सर्व
– लक्ष्मण पाध्ये
स्थापत्य विशारद, माजी अध्यक्ष, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्टस्, कल्याण सेंटर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा