भाजीपाला लागवड आणि विक्री व्यवसायाकडे महिलांचा अधिक कल
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिला बचत गटांचे मोठे जाळे पसरले आहे. त्यामुळे या बचता गटांना अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून त्यांना वेळोवेळी आर्थिक साहाय्य करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षाच्या कालावधीत जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील विविध बचत गटांना सुमारे दीड कोटी रुपयांचे कर्ज स्वरूपात आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातील महत्वाची बाब म्हणजे निम्म्याहून अधिक कर्ज हे बचत गटांनी भाजीपाला लागवड आणि विक्री व्यवसायासाठी घेतले आहे. यामुळे विविध लघु उद्योगांसह जिल्ह्यातील महिला बचत गट हे भाजीपाला लागवड आणि विक्री व्यवसायाकडे मोठया प्रमाणात वळत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>> डोंबिवलीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण
ठाणे जिल्हयात सध्या १० हजाराहून अधिक महिला बचत गट कार्यरत आहेत. तर यामध्ये सुमारे एक लाखाहून अधिक महिला जोडल्या गेल्या आहेत. याद्वारे महिलांना एक स्वयंरोजगाराची संधी मिळत आहे. या बचत गटांना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी राज्य ग्रामीण जीवन्नोती उमेद अभियाना अंतर्गत विविध उपायोजना राबविण्यात येत असतात. या अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना विविध लघु उद्योग सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याबरोबर प्रशासनाच्या बतीने आर्थिक साहाय्य देण्यात येते. या आर्थिक मदतीने बचत गटातील महिला शेळीपालन, कुक्कटपालन, शेती, शिवणकाम, खानावळ खाद्य पदार्थांच्या गाड्या, मसाले, पापड, लोणची तयार करणे तसेच विविध शोभेच्या वस्तू बनविणे यांसारखेल उद्योग सुरू करतात.मात्र हे उद्योग सुरु करताना अनेकदा या महिलांची आर्थिक बाजू कमकुवत असल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र या महिलांना लघु उद्योग सुरु करण्यासाठी कोणत्याही समस्यां येऊ नयेत म्हणून जिल्हा परिषदे मार्फत त्यांना खेळते भांडवल अर्थात त्यानं कर्ज दिले जाते. यातून या महिला विविध लघु उद्योग सूर करतात. याच पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षाच्या कालावधीत दीड कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे या महिलांना अर्थार्जन करून देणारे उद्योग सुरु करण्यासाठी एक उभारी मिळाली आहे.
भाजीपाला लागवडीला प्राधान्य
जिल्ह्याला मोठा ग्रामीण भाग लाभला असल्याने अनके नागरिक शेती व्यवसाय करत आहेत. यामुळे बचत गटातली महिलांनी देखील भाजीपाला लागवड आणि विक्री व्यवसायाला महत्व दिले आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीत जिल्हा परिषदेकडून १ हजार ५ बचत गटांना देण्यात आलेले दीड कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. यामध्ये निम्म्याहून अधिक कर्ज हे भाजीपाला लागवड, भात लागवड आणि विक्री यांसाठी देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले यांनी सांगितले.